*स्वतःला ओळखा करियर निवडा या विषयावर डायटचे मार्गदर्शन*
संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आयोजन
सोलापूर प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर यांच्या वतीने स्वतःला ओळखा करिअर निवडा अर्थात करिअर मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य, पुणे व व्यवसाय मार्गदर्शन आणि मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग यांच्यावतीने करिअर मार्गदर्शन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डायटच्या वतीने करण्यात आलं होतं. यामध्ये सकारात्मक आणि वास्तवदर्शी विचार, बहुविध बुद्धिमत्ता, स्वतःचा स्मार्टनेस, भाषिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाश विषयक बुद्धिमत्ता, शारीरिक गतीक्षमता अशा वैविध्यपूर्ण विषयावर विविध तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
सांकेतिक बुद्धिमत्तेपासून आंतर व्यक्ती बुद्धिमत्ता, व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता या सगळ्यांवर मार्गदर्शन करत स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपलं स्वप्न साकार करा. हा सकारात्मक दृष्टिकोन डाएटने निवडलेल्या सारंग पाटील, प्रा. संतोष पवार, डॉ. गणेश मुडेगावकर, डॉ.अल्पना परदेशी,प्रा.मानसी काळे,प्रा. प्रियांका पाटील, डॉ. प्रशांत चाबुकस्वार या तज्ञ मार्गदर्शकांनी दाखवला. आपल्या मार्गदर्शनातून.
या सत्रात विज्ञान विषयातील करिअरच्या संधी, तंत्रशिक्षणातल्या करिअरच्या संधी या विषयावर देखील मार्गदर्शन करण्यात आलं. कलाक्षेत्रातील करिअरच्या संधी कोणत्या यामध्ये कमर्शियल आर्टिस्ट पासून ते नाट्यशास्त्र, संगीत विशारद पासून वैविध्यपूर्ण मार्केटिंग क्षेत्रातल्या आणि वाणिज्य क्षेत्रातल्या कोणकोणत्या संधी आहेत. या संदर्भात देखील मार्गदर्शन करण्यात आलं. यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शहरातील कला वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील कार्यरत प्राध्यापक आणि तज्ञ व्यक्ती यांनी काम पाहिले.हे मार्गदर्शन संगमेश्वर कॉलेजच्या सभागृहामध्ये पार पडले. यामध्ये शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग होता .कार्यक्रम यशस्वीतेसाठी डायटचे प्राचार्य साळुंखे यांच्यासह डॉ.प्रभाकर बुधाराम आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा