स्पर्धा परीक्षांमध्ये परिश्रमासोबत आत्मविश्वासपूर्ण अभ्यास महत्वाचा - आयइएस सन्मती कुरुकुटे


संगमेश्वर कॉलेजच्या सिव्हिल सर्विसेस विभागात  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


सोलापूर प्रतिनिधी - 

पारंपरिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणात वाचनाची गोडी लागली आणि त्यातून स्पर्धा परीक्षेचे विश्व समजले की आपला प्रवास सोपा होतो. महाविद्यालयीन जीवनातच अभ्यासक्रम जाणून घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध स्तरातील  स्पर्धा परीक्षांचा  आपण विचार केला की आपण कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो  याचे आकलन होईल.  आपण  आर्ट, सायन्स, कॉमर्स,  आयआयटी, जेईई -नीट  हे सारं काही करताना दिशादर्शक अभ्यासाच्या मागे लागले पाहिजे.  त्यातून  काळ, काम आणि वेगाचे गणित बांधत आपण कठोर परिश्रमासोबत वेळ आणि आत्मविश्वास पूर्ण अभ्यास केला की स्पर्धा परीक्षेमध्ये नक्कीच  यशस्वी होता येते.''  असे प्रतिपादन एनटीपीसीचे संचालक, आयएएस सन्मती कुरकुटे यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजच्या सिव्हिल सर्विसेस विभागात आयोजित केलेल्या  मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते.  याप्रसंगी व्यासपीठावर  प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा,  सिविल सर्विसेस विभागाच्या प्रा.वंदना भानप,एनसीसीचे तुकाराम साळुंखे उपस्थित होते.

प्रारंभी व्याख्यानसत्राच्या आयोजनाचा हेतू  प्रास्ताविकातून वंदना भानप यानी स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.  सत्कारानंतर त्यांनी सविस्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  शेवटी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. 

                          ते पुढे म्हणाले की.''  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणे अवघड नाही. त्यासाठी वेळेचे सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे . दहावी बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू करण्याकडे कल वाढला आहे. मात्र  महाविद्यालयीन कालावधी अनुभवल्यानंतर तरुणांनी स्पर्धा परीक्षांचे अभ्यासाकडे वळले पाहिजे. महाविद्यालयीन कालावधी हा आपल्या आयुष्यावर अनुकूल असा परिणाम करत असतो. परिश्रम वेळेचे नियोजन केल्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे काहीच अवघड नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नुसती भोकमपट्टी करून उपयोग नाही. तर वाचलेले पुस्तके यांचे मनन करणे देखील गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना परिवारापासून स्वतःला दूर न नेता परिवारासोबत राहणे महत्त्वाचे आहे. पालकांनी देखील आपल्या पाल्यांवर हेच करावे तेच केले पाहिजे असा दबाव न टाकता आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी मोकळे वातावरण तयार करून देण्याची गरज आहे.स्पर्धा परीक्षेचा ऍडमिशन फॉर्म भरताना काळजी घेतल्यास मुलाखतीच्या वेळी अडचण येत नाही. दबाव आणि टेन्शन जुगारून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे काहीच अवघड नाही. 

अध्यक्षस्थानावरून प्र. प्राचार्य ऋतुराज बुवा म्हणाले  की,'' परिश्रम करून ज्ञानाची उंची गाठा आणि यशस्वी व्हा. अभ्यासाला कष्टाची जोड देऊन कसे यशस्वी होता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्मती कुरकुटे.   त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहेच त्या दिशेने आपण मार्गक्रमण करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.या वेळी महाविद्यालयाचे प्रा.शंकर वडणे,प्रा.डॉ.राजकुमार मोहरकर, डॉ.शिवाजी मस्के , डॉ.अण्णासाहेब साखरे ,संतोष पवार,प्रा. प्रकाश कादे,प्रा.नविता बल्लाल,प्रा.रेश्मा शेख ,प्रा.रिद्धी बुवा कॉलेजमधील वेगवेगळया विभागातील विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी क्षितिजा गालपल्ली तर आभार प्रदर्शन डॉ.राहुल साळुंखे यांनी केले.

  या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ लिंक दिलेली आहे

https://youtu.be/LuTWX5VdfJo?feature=shared  

  






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा