इस्रो आणि विज्ञान भारतीची ' स्पेस ऑन व्हील्स ' बस संगमेश्वरमध्ये


 विश्व कल्याणासाठी विज्ञान या भूमिकेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 






सोलापूर प्रतिनिधी - 

संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ' विज्ञान हे विश्व कल्याणासाठी' या भूमिकेतून  विज्ञान प्रदर्शनाचे  आयोजन करण्यात आले आहे .विद्यार्थ्यांमधील विज्ञान बद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी  सोलापूर सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने दिनांक २० आणि २१ डिसेंबर रोजी कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या बी बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. शहर आणि जिल्ह्यातल्या इयत्ता दहावी मधील शिक्षकांसोबत २० व २१ डिसेंबर रोजी ११  ते ४  या वेळेत विज्ञान प्रदर्शनास भेट द्यावी  तसेच  इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या झालेल्या सामंज्यस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आले आहे. विज्ञान भारतीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क करून त्यांच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्शनाच्या आयोजनाचे नियोजन केले जात आहे. स्पेस ऑन व्हील्स ही विशेष बस देशभर फिरविण्यात येते 

ती बस दिनांक २० आणि २१ तारखेलाच संगमेश्वर कॉलेजच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.  विज्ञान प्रेमी विद्यार्थी शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा असेआवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पेस ऑन व्हील्स संबंधी 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पेस ऑन व्हील्स' ही विशेष बस देशभर फिरविण्यात येते. या बसमध्ये इस्रो द्वारा निर्मित विविध प्रक्षेपक, उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच भारताच्या मंगलयान, चांद्रयान, उपग्रहांच्या दळणवळण व्यवस्था, दूरस्थ संवेदन तंत्र यांचा उपयोग यांच्या विषयी माहिती आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आणि राज्यातील विविध तालुक्यात ही बस जाते.

                बस मधील विविध प्रदर्शने- १) प्रक्षेपणयान (लॉन्च व्हेईकल) २) प्रक्षेपण तळ (launch pads) ३) उपग्रह उपयोग - दूरस्थ संप्रेषण ४) उपग्रह उपयोग - संदेशवहन ५) नाविक (NaVIC) स्वदेशी स्थितीदर्शक यंत्रणा ६) मंगलयान ७) चांद्रयान १, चांद्रयान -३ ९) आर्यभट्ट, रोहिणी भास्कर हे भारतीय उपग्रह १०) उष्णतारोधी कवच ११) विकास इंजिन











































































































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा