वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत डॉ.बी.जे.लोखंडे
संगमेश्वरच्या विज्ञान प्रदर्शनात ऋषिकेश, रितेश प्रथम
सोलापूर दिनांक २१ डिसेंबर २०२४
वैज्ञानिक संशोधनातून अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा आपल्याला वरिष्ठ पातळीवरील सूक्ष्म संशोधनात होतो क्षेत्र कोणतेही असो त्यातील संशोधनात समस्या निराकरण होणारे प्रोजेक्ट तयार झाले पाहिजेत आपण कठोर परिश्रमाने संशोधनात कार्य करीत राहिलो तर नक्कीच राष्ट्राचे नाव उज्वल होईल संशोधनाला गती मिळेल कमी खर्चात कमी वेळेत गतिमान संशोधन झाले तर ते संशोधन शाश्वत राहील असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील पदार्थ विज्ञान विभागातील प्रा.डॉ. बी.जे. लोखंडे यांनी केले. संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि सायन्स सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, विज्ञान प्रदर्शन समन्वयक विश्वजीत आहेरकर, शाखा समन्वयक विशाल जत्ती, परीक्षक श्रीमती मुनाळे आदी उपस्थित होते.
डॉ.लोखंडे पुढे म्हणाले की," प्रवाहाच्या विरुद्ध झालेले संशोधन महत्त्वाचे असते. त्या संशोधनाला जगात मान्यता मिळते. औद्योगीकरणातील अन्य घटकात त्याचा फायदा होतो. परिणामी राष्ट्र विकासात आपण हातभार लावू शकतो. त्यातून नवे उद्योग आपण ही निर्माण करू शकतो. स्टार्टअप ला त्यातून चालना मिळू शकते.
विज्ञान प्रकल्पांचे परीक्षण प्रा.नीलिमा माळगे, प्रा.नागेश नकाते प्रा.सुलक्षणा भरगंडे, प्रा.जीवराज कस्तुरे,प्रा.शरयू महाजन यांनी केले.
निकाल याप्रमाणे
प्रथम- ऋषिकेश गंगणवार, रितेश घुले (स्मार्ट गॉगल) संगमेश्वर कॉलेज - द्वितीय क्रमांक - शोभा मदने, सुजाता राठोड, संस्कृती यादव (श्रीमती सावित्रीबाई खडतरे कॉलेज, पाकणी--बायोमास प्रोडक्शन) तृतीय क्रमांक- प्रज्ञा दिनकर वाघमारे, शांभवी प्रशांत यादव (कोनिक सेक्शन अँड एप्लीकेशन - संगमेश्वर कॉलेज) उत्तेजनार्थ प्रथम- स्नेहा श्रीकांत उदेशी, प्रतीक्षा पंडित हाके ( एस. व्ही. सी. एस.ज्युनियर कॉलेज, भवानी पेठ )द्वितीय क्रमांक उत्तेजनार्थ - वैभव समाधान धुमाळ, आदित्य श्रावण सोनवणे (श्रीमती निर्मलाताई ठोकळ जुनिअर कॉलेज) उत्तेजनार्थ तृतीय- विश्वजीत महावरकर, संगमेश्वर शिरढोणकर, उत्तेजनार्थ चौथा - वैभव सुरवसे, रामभाऊ साहू, उत्तेजनार्थ पाचवा - पद्मजा गुत्तेदार , राधिका कुंभार ( वालचंद कॉलेज) व्यंकटेश बंडा( दयानंद कॉलेज)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा