भारतीय परंपरेत योग आणि आयुर्वेदशास्त्र महत्वाचे -- डॉ किरण पाठक


संगमेश्वरमध्ये ' डायट ' च्या शिक्षण प्रशिक्षणामध्ये दिलखुलास संवाद


सोलापूर दिनांक २१ मार्च 

''योग आणि आयुर्वेद ही भारतीय परंपरेतील दोन महत्त्वाची शास्त्र आहेत, जी शरीर, मन आणि आत्म्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. दोन्ही शास्त्र दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवता येते.''असे प्रतिपादन डॉ किरण पाठक यांनी केलं 

 त्या संगमेश्वर कॉलेज आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण व्याख्यानात डॉ.पाठक यांनी दिलखुलास चर्चा केली. त्या पुढे म्हणाल्या 

१ सकाळची दिनचर्या (मॉर्निंग रूटीन)

लवकर उठणे (ब्रह्ममुहूर्तात जागरण) – पहाटे ४:३० ते ६:०० या वेळेत उठल्याने शरीरात नवीन ऊर्जा संचारते. जलसेवन (उषःपान) – सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.दंतधावन (तोंडाची स्वच्छता) – आयुर्वेदानुसार वड, कडुनिंब किंवा बाभळीच्या काडीने दात घासणे लाभदायक आहे. जिभेची स्वच्छता – टॉन्ग स्क्रॅपरने जिभेवरील दोष दूर करावेत.

नेत्रप्रक्षालन – ताज्या पाण्याने डोळे धुतल्याने दृष्टी सुधारते. अभ्यंग (तेल लावणे) – तिळाचे किंवा नारळाचे तेल लावल्याने त्वचा आणि स्नायू बळकट होतात. योगसाधना – सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान यांचा समावेश करावा.

२. आहारशैली (डाएट आणि न्यूट्रिशन)

सात्विक आहार – ताजा, शिजवलेला आणि सहज पचणारा आहार घ्यावा. ऋतूनुसार आहार – उन्हाळ्यात शीतल अन्न, हिवाळ्यात उष्ण पदार्थ, पावसाळ्यात हलका आहार घ्यावा. त्रिदोषानुसार आहार – वात, पित्त आणि कफ यानुसार आहार घ्यावा. नियमित वेळेवर जेवण – जेवणाचा वेळ ठरलेला असावा.ओव्हरईटिंग टाळा – ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवावे.

३. आरोग्यदायी संध्या दिनचर्या

संध्याकाळी फिरायला जाणे – हलका व्यायाम किंवा चालणे आवश्यक आहे. रात्री हलका आहार – सूर्यास्तानंतर हलके आणि लवकर जेवावे. गोड आणि शांत झोप – झोपण्यापूर्वी तूप किंवा दूध घेतल्याने झोप चांगली लागते. गॅझेट्सपासून दूर राहा – झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल आणि स्क्रीन टाळाव्यात.

४. आयुर्वेदिक उपाय आणि औषधी वनस्पती तुळस, गवती चहा, आलं, हळद – रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर.त्रिफळा – पचनसंस्थेसाठी उत्तम. आवळा – त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. अश्वगंधा आणि ब्राह्मी – मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त.योग आणि आयुर्वेद यांचा समतोल साधल्यास आरोग्य उत्तम राहते आणि जीवनशैली आनंदी व निरोगी बनते

  शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्ताने अन्नकोषा विषयी सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे अन्नमयकोश हा शरीराचा स्थूल स्तर आहे, जो अन्न व पाण्याच्या सेवनाने पोसला जातो. हा कोश आपल्या शारीरिक आरोग्यासाठी जबाबदार आहे आणि तो मुख्यतः अन्नावर अवलंबून असतो, म्हणूनच याला 'अन्नमय' असे नाव दिले गेले आहे.अन्नमयकोश हा पंचकोशातील सर्वात बाह्य स्तर आहे आणि त्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर शरीर निरोगी असेल, तर मन आणि आत्म्यालाही योग्य प्रकारे विकसित करता येते. योग्य आहार, योग आणि साधना यामुळे हा कोश संतुलित राहतो आणि संपूर्ण जीवन आरोग्यदायी व आनंदी होऊ शकते.याशिवाय प्राणमयकोश – ऊर्जा आणि प्राणशक्ती यांचा स्तर ,मनोमयकोश – मन, भावना आणि विचारांचा स्तर विज्ञानमयकोश – बुध्दी आणि निर्णयक्षमतेचा स्तर,आनंदमयकोश – परम आनंद व आत्मशांतीचा स्तर या बाबींचाही आपण अभ्यास करावा .

                                                      अन्नमयकोशाची शुद्धता आणि त्याचे महत्त्व सांगायचे झाल्यास  शुद्ध आणि सात्विक आहार घेतल्याने अन्नमयकोश मजबूत होतो.आरोग्यदायी जीवनशैली, योगाभ्यास, व्यायाम, आणि योग्य पोषण यांच्या साहाय्याने हा कोश संतुलित ठेवता येतो. २१ व्या शतकातील बदलांना सामोरे जाताना शिक्षण क्षेत्रामध्ये या सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन पुढील आनंददायी शिक्षणासाठी सज्ज झाले पाहिजे. असा मोलाचा संदेश डॉ. किरण पाठक यांनी शिक्षकांशी संवाद साधताना दिला.

प्रारंभी संतोष पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर तेजश्री तळे यांनी  प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानानंतर शेवटी डॉ गणेश मुडेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के