संगमेश्वर हे संस्काराचे विद्यापीठ
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात रविमुकुल यांचे प्रतिपादन
सोलापूर,
संगमेश्वर महाविद्यालय हे केवळ क्रमिक अभ्यासक्रम शिकवणारी शैक्षणिक संस्था नसून संस्काराचे विद्यापीठ असल्याचे सांगतानाच ज्ञान सर्वत्र असून विद्यार्थ्यांनी आपली ओंजळ खुली ठेऊन ज्ञानार्जन करावे असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार आणि लेखक रविमुकुल यांनी केले.
सोलापूरातील पहिली स्वायत्त संस्था ठरण्याचा मान मिळवलेल्या संगमेश्वर महाविद्यालयात 72 वा वार्षिक शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुस्तकांच्या मुखपृष्ट रेखाटनात प्रसिध्द असलेले रविमुकूल बोलत होते.
या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, अॅड. रा. गो. म्हेत्रस, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. गोटे, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख उपस्थित होते. याप्रसंगी रविमुकुल यांच्या पत्नी भार्गवी कुलकर्णी, अॅड.आर. एस. पाटील, अनिल परमशेट्टी,सुभाष मुनाळे.राजशेखर पाटील, पी. एस. चिडगुपकर, महादेव जम्मा, राजन अन्यापनावर, महादेव पाटील, प्रा. ए. के. हुली यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना रविमुकुल यांनी संगमेश्वर महाविद्यालयाच्या परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थी दशेमध्ये संस्कार होत नसतात तर ते करवून घ्यावे लागतात. ज्ञान, शिस्त, सेवा, समर्पण यासारख्या मुल्यांचे संस्कार संगमेश्वर महाविद्यालयात करवून घेतले जातात. त्यानेच विद्याथ्यांचे जीवन परीपूर्ण होत असल्याचा विश्वास रविमुकुल यांनी व्यक्त केला. आपण संगमेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत, याचा रास्त अभिमान असल्याचे सांगितले. आपल्या भावस्पर्षी मनोगतातध्ये संगमेश्वरच्या शिक्षकांचा व शैक्षणिक वातावरणाचा आपल्यावर फार प्रभाव असल्याचे नमूद करत संगमेश्वरमधील शिक्षण संपल्यानंतर संगमेश्वरसारखे शैक्षणिक वातावरण व शिक्षक पुन्हा पुढे फारसे अनुभवाला आले नाही असेही त्यांनी सांगीतले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रिया पाटील या विद्यार्थ्यीनीच्या ईशस्तवनाने व संगमेश्वर गीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्र.प्राचार्य डॉ. ऋऋतुराज बुवा यांनी केले. महाविद्यालयाचे वार्षिक शैक्षणिक अहवाल वाचनही डॉ.बुवा यांनी केले. संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे वार्षिक अहवाल वाचन प्राचार्य एस. डी. गोटे यांनी केले. कनिष्ट विभागाचे शैक्षणिक पारितोषिक गुणवत्ता यादीचे वाचन प्रा. एस. एन. विजापूरे तर वरिष्ठ विभागाचे शैक्षणिक पारितोषिक गुणवत्ता यादीचे वाचन डॉ. व्ही. एन. मुलीमनी यांनी केले. संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे वार्षिक शैक्षणिक पारितोषिक गुणवत्ता यादीचे वाचन प्रा.जी. एस. घनाते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अनिता अलकुंटे यांनी करुन दिला. याप्रसंगी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. पुष्पांजली मेत्री, प्रा. संतोष पवार यांनी केले. प्रिया पाटील या विद्यार्थ्यीनिने गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्याथों, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.'
------------------
विजबचतीचा आयुष्यभराचा धडा
आपण संगमेश्वरच्या वसतीगृहात राहत असतांना तत्कालिन प्राचार्य सावे रोज स्वत पाहणी करत. बाहेरून बंद असलेल्या खोलीतील लाईट चालू दिसल्यास एका दिवसासाठी तो बल्ब जप्त केला जात असे. अशी आठवण सांगून सावे सरांच्या शिस्तीच्या बडग्याने आपण आयुष्यभराचा विज बचतीचा धडा घेतल्याचे रविमुकुल यांनी सांगितले. हा किस्सा एकतांना विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शब्द आणि चित्र हे आपल्या आनंदाचे आणि उपजीवीकेचेही साधन आहेत. आपण अनेक पुस्तकांचे मुखपृष्ट केले. प्रत्येक चित्राने आपल्याला अधिक समृध्द केले. आपल्याला संगमेश्वरमध्ये मिळालेले शिक्षक आयुष्यात कुठेही मिळाले नसल्याची भावनिक उद्गार रविमुकुल यांना काढले
![]() |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा