शिक्षणात रेडिओ ऐकण्याचे अनेक फायदे - आर जे अमृत ढगे

प्रभावी संवाद कौशल्य आणि रेडिओ यावर डायटच्या वतीने व्याख्यान सोलापूर प्रतिनिधी २० ''शिक्षणात रेडिओ ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः ग्रामीण भागात किंवा संसाधनांच्या अभावात शिक्षण देण्यासाठी रेडिओ एक प्रभावी माध्यम ठरू शकतो. खालील काही महत्त्वाचे फायदे आहेत: रेडिओ हा तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले माध्यम आहे.इंटरनेट किंवा महागड्या उपकरणांची गरज नसल्याने सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचते. रेडिओवरील शैक्षणिक कार्यक्रम ऐकून विद्यार्थ्यांचे ऐकण्याचे कौशल्य (Listening Skills) सुधारते. योग्य उच्चार, शब्दसंग्रह, आणि भाषा समजण्याची क्षमता वाढते.अनेक शैक्षणिक विषयांवर आधारित कार्यक्रम, चर्चासत्रे, मुलाखती यामुळे शिक्षण अधिक समृद्ध होते.'' असे मत आर जे अमृत ढगे यांनी मांडले. ते डायट वेळापूर आणि संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण शिबिरात दिलखुलास संवाद साधत होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरचे प्रा. डॉ. प्रभाकर बुधाराम उपस्थित होते. विज्ञान, इतिहास, गणित यांसा...