अ‍ॅनिमिया जनजागृती शिबिर आणि 'आरोग्य व पोषण' विषयक व्याख्यान

 


सोलापूर, दि.  ४ ऑक्टोबर २०२५ 

फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयात रक्तातील हीमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला आणि लाभ घेतला.

विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पोषणाच्या सवयी सुधाराव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाची सुरुवात सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ. समन तांबोळी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी ‘आरोग्य आणि पोषण’ या विषयावर सखोल माहिती दिली. आहारातील मूलभूत घटक, अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, तसेच तणावमुक्त जीवनशैली यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.तसेच १४७ विद्यार्थ्यांची एच.बी. चाचणी करण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यक्रम समन्वयक  विरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे  मोलाचे योगदान लाभले.

या उपक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.ज्योती काडादी आणि महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डाॅ. ऋतुराज बुवा यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे आयोजन कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या समन्वयक प्रा.राजश्री हुंडेकरी  आणि ‘आरोग्यम क्लब’चे अध्यक्ष प्रा. डॉ. अर्जुन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. रोहिणी अन्यापनावर आणि प्रा. मयूर ढवण यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समृद्धी शिंदे हिने केले, पाहुण्यांचा परिचय मुसेबा पटेल हिने करून दिला, तर आभार प्रदर्शन रेशम खान हिने केले.‘आरोग्यम क्लब’चे सदस्य आदित्य झिंगाडे, अथर्व जवंजल, अभिषेक भारती आणि अस्मित गिरम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी