युवा महोत्सवात उपविजेत्या कलाकारांचा कौतुक सोहळा
सोलापूर प्रतिनिधी -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या युवा महोत्सवात उपविजेत्या ठरलेल्या संगमेश्वर कॉलेजच्या कलाकारांचा कॉलेजच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी विजेत्या सर्व संघाचे कौतुक केले आणि त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना सचिव ज्योती काडादी यांनी कलाकारांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले. भविष्यातही असेच अथक परिश्रम करून आपण आपला संघ पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. संगमेश्वर कॉलेजची क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक परंपराही खूप मोठी आहे. तो वारसा जपण्याचे कर्तव्य कलाकारांनी निभावले आहे.असा मनोदय व्यक्त केला.
कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात प्रारंभी प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.दादासाहेब खांडेकर यांनी सविस्तर वृत्तांत सांगितला. त्यानंतर कलाकारांचा सत्कार झाला. सत्कार नंतर गोल्डन गर्ल पुरस्कार विजेती सई दरेकर आणि गतवर्षीच्या गोल्डन बॉय पुरस्कार विजेता जैद शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शैक्षणिक सल्लागार प्रा. डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य प्रा.डॉ.ऋतुराज बुवा, उपप्राचार्य वंदना पुरोहित, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दादासाहेब खांडेकर,प्रा.डॉ. साहेबगौडा पाटील, प्रा.डॉ.प्रताप गोरेपाटील, प्रा.डॉ.बजरंग मेटील, कॅप्टन शिल्पा लब्बा, यांच्यासह युवा महोत्सवातील नाट्य प्रशिक्षक श्रीपाद कुडक्याल, दीपक शिंदे ,बळवंत जोशी,विक्रांत सिंह चौहान,सहायक चिदानंद स्वामी आणि कलाकार विद्यार्थी उपस्थित होते.
निकाल याप्रमाणे - उत्कृष्ट संघ व्यवस्थापक द्वितीय क्रमांक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.दादासाहेब खांडेकर ,ललित विभाग- रांगोळी - प्रथम क्रमांक - निसर्ग लोहार , कातरकाम - प्रथम क्रमांक - शुभम सब्बन, मातीकाम - प्रथम क्रमांक - निसर्ग लोहार ,व्यंगचित्र - तृतीय क्रमांक - निसर्ग लोहार ,स्थळचित्र - द्वितीय क्रमांक - निसर्ग लोहार ,निर्मिती चित्र - निसर्ग लोहार, शुभम सब्बन,जैद शेख, शुभम सब्बन .\ वाड्मय विभाग- काव्यवाचन - प्रथम क्रमांक - जैद हसन शेख, संगीत विभाग , शास्त्रीय गायन - द्वितीय - वैष्णवी व्हनकडे, समूहगीत - प्रथम - (श्रावणी नंदी, रक्षिता बिराजदार, सलोनी पानपाटील, प्रज्ञा बांगड, सानिया शेख,सई दरेकर, रोहित राजपूत ) समूहगीत पाश्चात्य - प्रथम ( श्रावणी नंदी, कामाक्षी सुतार,रक्षिता बिराजदार, सलोनी पानपाटील, प्रज्ञा बांगड, सानिया शेख,सई दरेकर ) पाश्चात्य गायन वैयक्तिक - द्वितीय क्रमांक - कामाक्षी सुतार
मूकनाट्य - प्रथम - जैद शेख, सई दरेकर, ऋषिकेश शिवशेट्टी, गौरी बायस, रोहित राजपूत, संजना गायकवाड, नकला - प्रथम - जैद शेख ,एकांकिका - प्रथम - जैद शेख,सई दरेकर, निसर्ग लोहार, गोपाळ नकाते, प्रांजल तंबाके, संजना गायकवाड, तेजस कदम, ऋषिकेश शिवशेट्टी ,स्त्री अभिनय प्रथम क्रमांक - सई दरेकर पुरुष अभिनय प्रथम क्रमांक - जैद शेख .लोककला - कव्वाली ( तृतीय ) अभिनंदन गायकवाड, श्रावणी नंदी, रोहित राजपूत, जैद शेख, सई दरेकर, सलोनी पानपाटील, रक्षिता बिराजदार, सानिया शेख, प्रज्ञा बांगड. नृत्य विभाग -- लोकनृत्य - प्रथम - सई दरेकर, संजना गायकवाड, प्रांजल तंबाके, गौरी बायस, संजना चव्हाण, मिनाक्षी बनसोडे, शिवलीला बनसोडे, आरती राठोड, अंजली सलगर, रक्षिता बिराजदार, जैद शेख. शोभायात्रा - तृतीय क्रमांक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा