संगमेश्वरकॉलेजची सोलापूर महानगरपालिकेस भेट
संगमेश्वर कॉलेजमधील भूगोल विभागातील विद्यार्थ्यांची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले. भूगोलाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले नगर नियोजन, नागरीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी व नागरी समस्या या विषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील घनकचरा संकलन आणि त्यांचे नियंत्रण तसेच सोलापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक यंत्रणेचे नियंत्रण याशिवाय सोलापूर शहर व हद्दवाढ परिसरामध्ये पाणीपुरवठ्याचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणारे ऑनलाईन नियंत्रणाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. नव्यानेच सुशोभीकरण करण्यात आलेली महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू याशिवाय महानगरपालिकेतील प्रशासकीय कार्यालय विविध विभाग यांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. सोलापूर शहराचा विकास, नगर नियोजनाचा इतिहास आणि वस्तुस्थिती यांची माहिती दृकश्राव्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना देण्यात आले. महानगरपालिकेचे सभागृह आणि महापौरांचे दालनास भेट देण्यात आले.या भेटी दरम्यान
श्री.नितीन साके (सहा. कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी), श्री. गणेश बिराजदार (जनसंपर्क अधिकारी), मतीन सय्यद( सहायक संगणक प्रोग्रामर), श्री. मनीष भिशूनुरकर (उपसंचालक, नगररचना विभाग), श्री. आनंद जोशी (सहाय्यक अभियंता, नगररचना विभाग), श्री. प्रमोद गोविंदवार (कनिष्ठ अभियंता, नगररचना विभाग) यांनी विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना नागरी कर्तव्य समजावून सांगितले. या भेटीस महाविद्यालयातील एकूण 55 विद्यार्थी उपस्थित होते. या अभ्यास भेटीसाठी प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर, डॉ. शिवाजी मस्के यांचे मार्गदर्शन लाभले. तर ही भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ मंजू संगेपाग, प्रा. शिरीष जाधव प्रा. अनिता पवार व श्री. धनंजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले.
दिनांक 8 ऑगस्ट 2024
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा