कॉलेज शिक्षणानंतर व्यावसायिकतेत इंग्रजी बोलण्याचे मूल्य अमूल्य आहे - अभियंता प्रियंका गांधी

  संगमेश्वर कॉलेजमध्ये स्पोकन इंग्लिश कोर्सचे उद्घाटन 

सोलापूर दिनांक ८ प्रतिनिधी  

'' इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने जगात तिचा वापर सर्वत्र होतोय त्यामुळे मातृभाषेबरोबरच इंग्रजीतून शिक्षण होणे आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान घेणे हे कष्ट साध्य असल्याने त्यात आपण पारंगत होऊन शकतो .त्यामुळे आपण जगाशी संवाद साधू शकतो, म्हणून  जीवन जगण्याच्या कलेबरोबर  आपण व्यावसायिक म्हणून जेव्हा  समाजात वावरतो तेव्हा इंग्रजी भाषेचे मूल्य अमूल्य आहे.'' असे प्रतिपादन  सॉफ्टवेअर अभियंता,  संवाद कौशल्यतज्ञ  प्रियांका गांधी  यांनी व्यक्त केले.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग येथे  स्पोकन इंग्लिश कोर्सच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.  अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रसाद कुंटे होते.


           प्रारंभी प्रास्ताविक शिवराज देसाई  यांनी केले. पाहुण्यांची ओळख तेजश्री तळे यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले,'' इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने नोकरी आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी आपणही भाषा प्रयत्नपूर्वक शिकली पाहिजे. भाषा संकुलाचा उपक्रम स्तुत्य आहे. भाषा संकुलातील विविध उपक्रमासंबंधी आपण भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुडडेवाडी यांच्याशी 9923970083 संपर्क साधावा''.

                  याप्रसंगी  भाषा संकुलातील अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी,  प्रदीप आर्य, डॉ. गणेश मुडेगावकर,  विश्वनाथ कक्कळमेली,मल्लिकार्जुन पाटील, निनाद सपकाळ ही शिक्षक मंडळी उपस्थित होती.सूत्रसंचालन जान्हवी नागणसुरे, श्रावणी चव्हाण यांनी तर आभार  हर्षादा बुधले या विद्यार्थीनीने मानले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे