पोस्ट्स

डिसेंबर २३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालेय विद्यार्थ्यांचा सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
सोलापूर दि .२३  सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांसाठी रेल्वे बोर्ड, सरळ सेवा भरती, राज्यसेवा, पोलीस भरती, संघ लोकसेवा आयोगाच्या  स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होताना कला शाखेतील अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेता यावे. या हेतूने इयत्ता नववी दहावीसाठी माध्यमिक गटातून, इयत्ता अकरावी बारावीसाठी उच्च माध्यमिक गटातून सामान्य ज्ञान स्पर्धा  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने घेण्यात आली  .ही स्पर्धा २३ डिसेंबरला दुपारी २ वाजता संपन्न झाली. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ १०० प्रश्न, १०० गुण,९० मिनिटे वेळ असे यामध्ये नियोजन आहे. कला, क्रीडा साहित्य, संस्कृती, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा  या स्पर्धा परीक्षेत समावेश होता. सोलापूर शहर आणि परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी कला शाखेतील समन्वयक शिवशरण दुलंगे यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.