बिझनेस क्विझमध्ये अपूर्वा आणि संस्कृती विजेते
उद्योग विश्वात अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे ठरते. वासुदेव बंग सोलापूर दिनांक २२ ''स्वतःला प्रश्न विचारा. असे म्हंटले जाते बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा मेंदूचा विकास प्रश्न विचारण्यातून होतो. तरुणांनी उद्योजकाच्या दृष्टिकोनातून पुढे कसे जावे यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकत गेले पाहिजे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो. कुठल्याही उद्योगाला डिग्रीची आवश्यकता नाही, फक्त त्या दृष्टिकोनातून विचार आणि कष्ट घेण्याची तयारी असावी. चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे.''असे प्रतिपादन उद्योजक वासुदेव बंग डेटा प्रा.लि.यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज कॉमर्स विभाग आयोजित बिजनेस क्विझच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य शरण काडादी, प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे वाणिज्य विभागप्रमुख बाबास...