बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे - राज पवार
भाषा संकुलच्यावतीने ' परीक्षेला जाता जाता ' या मालेत व्याख्यान सोलापूर -( दिनांक ९ ) ''बारावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पायरी मानली जाते. या परीक्षेत मराठी विषयासाठी नव्या मूल्यांकन पद्धतीनुसार कृतीपत्रिकेचा अवलंब केला गेला आहे. कृतीपत्रिकेतील विविध प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांच्या ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन अशा समग्र भाषिक कौशल्यांची परीक्षा घेतात. यापैकी *लेखन कौशल्याचा* विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण तो विद्यार्थ्यांच्या भाषेतील प्रावीण्य, मांडणी क्षमता आणि विचारसंपन्नता यांचे सम्यक मूल्यमापन करतो. बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे आहे. असे मत दयानंद महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागातील अध्यापक राज पवार यांनी मांडले. भाषा संकुल आयोजित मराठी कृतीपत्रिकेवरील सविस्तर मार्गदर्शनात बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्रा.अशोक निंबर्गी,प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते. पुढे म्हणले की -लेखन कौशल्यामध्ये पत्र, संवाद, मुलाखत, जाहिरात, वृत्तलेखन, रिपोर्ट, ब्लॉग, ई-मेल, सूचना, अप...