पोस्ट्स

डिसेंबर १३, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ताऱ्यांचा आम्हाला अभिमान --- धर्मराज काडादी

इमेज
खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी  खेळाडूंचा कॉलेजच्या वतीने सत्कार सोलापूर -  '' कॉलेज स्तरावर वैविध्यपूर्ण क्रीडा प्रकारात संगमेश्वरचे विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात. त्यानंतर पुढील टप्पा विद्यापीठ, विभाग असे करत करत राज्य आणि राज्याचे प्रतिनिधित्व करतात. राज्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर पदक घेऊन येतात. ही परंपरा खूप जुनी आहे. या परंपरेला साजेसे असे काम करणाऱ्या या क्रीडांगणावरील ताऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  मी त्या सर्व क्रीडांगणावरील ताऱ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो ''  असे गौरव उद्गार संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी काढले. ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते.  कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी-- १ विनीत दिनकर -  राज्यस्तरीय अंत...