पोस्ट्स

डिसेंबर २९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजच्या बी.कॉम. 1978 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

इमेज
  सोलापूर दिनांक -२७ डिसेंबर २०२५  बी.कॉम. 1978 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी केशरी अबोली रंगाच्या टी-शर्ट मधील सर्व मान्यवर मंडळी कॉलेजमध्ये आली. त्यांनी कॉलेजचा परिसर बारकाईने पाहून घेतला. प्रत्येकाच्या आठवणींना इथे उजाळा मिळला. त्यानंतर ग्रंथालय, मैदान, क्रीडा विभाग, जिमखाना, नव्याने सुरू झालेले youtube चॅनेलचे हॉल अर्थात कॉलेज मीडिया सेंटर, नवीन इमारती, संगणक कक्ष या सर्व बाबी बारकाईने पाहिल्या. त्यानंतर आरजे श्रद्धा हिने या ज्येष्ठांच्या अनुभवावर मुलाखती घेतल्या. संगमेश्वर हे क्रीडा परंपरेतील अव्वल असलेलले  एकमेव कॉलेज, शिवाजी विद्यापीठापासून असल्याचं आवर्जून क्रीडापटू सांगत होते. त्यांच्यासोबत इथल्या गॅदरिंग मधले काही मजेदार किस्सेही यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. सोबतच के. भोगीशयना यांचा दरारा, गुणवत्तेच्या बाबतीत असलेलं त्यांचं धोरण.एक माणूस म्हणून लोण्याहूनही मऊ असलेला मायेचा माणूस कसा होता? अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  या विद्यार्थ्यांसोबत एक वर्ष काही वर्षे ज्युनिअर असले...

महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून विकसित भारताची स्वप्नपूर्ती - कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

इमेज
   संगमेश्वरमध्ये  महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्यावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न सोलापूर :  भारतीय ज्ञाणप्रणालीमध्ये महात्मा बसवेश्वर्‌ हे एक महत्वाचे तत्त्वचिंतक आणि समाजसुधारक आहेत. त्यांनी बाराव्या शतकामध्ये केलेले कार्य आणि मांडलेले विचार क्रांतिकारक होते. तत्कालीन समाजातील विषमता, भेदाभेद आणि कर्मकांडाविरुध्द त्यांनी आवाज उठविला. अनुभव मंडपाच्या माध्यामातून क्रांतिकारक कार्य केले. त्याचे विचार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांवर आधारित होते. त्यामध्ये देशाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा विचार महत्त्वाचा असून आजच्या काळालाही या विचारांची आवश्यकता आहे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारातूनच आजचे विकसित भारताचे स्वप्न्‌ पूर्ण होईल. असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी मांडले.   संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महात्मा बसवेश्वर्‌ अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा बसवेश्वर यांचे विचार व कार्य’ या विषयावर...