पोस्ट्स

डिसेंबर ११, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाविद्यालयीन जीवनात भाषा शिक्षण जगण्याचं बळ देते - कवी इंद्रजीत घुले

इमेज
दृकश्राव्य माध्यमासाठीचे सादरीकरण याविषयीचे मार्गदर्शन सोलापूर - संगमेश्वर कॉलेज भाषा संकुलाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना  ' रेडिओ जॉकी' विषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी मुलाखत कशी घ्यावी किंवा घ्यावी. यासंदर्भातले मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनात आकाशवाणीत मुलाखतीसाठी आलेल्या इंद्रजीत घुले यांचा संवाद घडवून आणला. या संवादात त्यानी दृकश्राव्य माध्यमासाठीचे सादरीकरण याविषयी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले की,'' महाविद्यालयीन जीवनात भाषेची गोडी लागली की आपण झपाट्याने वाचत जातो. या वाचण्यातूनच प्राप्त परिस्थिती मधून आपण कसे मार्ग काढू शकतो याचे आकलन होते. आपोआपच व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया होते. जडणघडणीच्या काळात भाषा जगण्याचं बळ देते''.  याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी,अशोक निंबर्गी,सायबण्णा निंबर्गी उपस्थित होते.             प्रारंभी संतोष पवार यांनी 'रेडिओ जॉकी ' संदर्भात आकाशवाणीचा इतिहास सांगत, रेडिओ जॉकीतील स्थित्यंतर...