पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन,सामान्य ज्ञानासह विविध स्पर्धांचे आयोजन

इमेज
सोलापूर दिनांक १९  -  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने दिनांक 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी अनुक्रमे जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन ( दि २२,२३ ),बिझनेस क्विझ (दि २२ ),सामान्य ज्ञान स्पर्धा (दि २३ ) ,सुलेखन व अभिवाचन ( दि २४ ) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय, शेतकी महाविद्यालयामधीलविद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे यंदाचे हे नववे वर्ष असून शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.  २२  डिसेंबरला वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील स्थित्यंतरे, या क्षेत्रातील आव्हाने यांची जाण व्हावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी. या उद्देशाने बिजनेस क्विझचे आयोजन करण्यात आले आहे. विविध महाविद्यालयातील संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी दहा वाजता ही स्पर्धा संगमेश्वर कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे.  सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्या...