संगमेश्वरच्या अभिवाचन, सुलेखन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद

कनिष्ठ महाविद्यालयातील भाषा 

संकुलाचा अभिनव उपक्रम

सोलापूर प्रतिनिधी

संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभागाच्या भाषा संकुलाच्या वतीने  आयोजित मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत या पाच भाषांमधील अभिवाचन सुलेखन स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात शहरातील विविध महाविद्यालयातील ५१०  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अभिवाचनासाठी पाठ्यपुस्तकातील आपल्या आवडीची कथा-कविता, गद्य उतारा निवडण्यास विद्यार्थ्यांना संधी दिली होती .तीन मिनिटांच्या अवधीत विद्यार्थ्यांनी नाट्य उतारा, नामवंत साहित्यिकांच्या कथा-कादंबऱ्या यामधील उतारे, कविता, स्वरचित कविता, प्रबोधनपर लेख, विनोदी उतारे सादर करून उपस्थितांची माने जिंकली. शुद्ध आणि सुंदर हस्ताक्षर हे उत्तम व्यक्तिमत्त्वाचे लक्षण असल्याने त्याचा विकास व्हावा या उद्देशाने सुलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत  विद्यार्थ्यांचे रेखीव लेखन पहावयास मिळाले.


            प्रारंभी सरस्वती पूजन पर्यवेक्षक उषा जमादार, संघप्रकाश दुड्डे  (हिंदी विभागप्रमुख)  डॉ. नानासाहेब गव्हाणे, संस्कृतचे सौ व श्री सचिन सवाई डॉ.शिवानंद तडवळ ( कन्नड विभागप्रमुख, पु.अ. हो.सो. विद्यापीठ ) मल्लिनाथ साखरे, शिवराज पाटील या मान्यवर आणि परीक्षकांच्या शुभहस्ते झाले. त्यानंतर कोमल कोंडा यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. ''उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना भाषेचा लळा लागावा यासाठी विद्यार्थीकेंद्री हा उपक्रम आहे''. असे प्रतिपादन उद्घाटन सत्रात बोलताना प्र. प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी केले तर उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी वैविध्यपूर्ण भाषेचे आकलन झाल्याने व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो असे सांगितले.

                  याप्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास पुजारी यांच्यासह भाषा संकुलातील प्रा. अशोक निंबर्गी, प्रा.तानाजी घाडगे,  प्रा.सायबण्णा निम्बर्गी, डॉ.गणेश मुडेगावकर, प्रा. शिवराज देसाई, प्रा.प्रदीप आर्य, प्रा.सविता पाटील, प्रा.संतोष पवार यांच्यासह प्रा.चंद्रकांत जाधव, प्रा.विद्या अर्जुनसोंडकर, प्रा.प्राची कुंटे, प्रा.लता यादव आदी उपस्थित होते. प्रा.अनिता अलकुंटे, प्रा.तेजश्री तळे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.मल्लिकार्जुन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. संतोष फुलारी, रायगोंडा हत्ताळी यांनी स्पर्धेसाठी सहाय्य केले. प्रमुख पाहुण्यांच्या शुभेच्छा नंतर विविध विषय निहाय गटातून या स्पर्धा संपन्न झाल्या.



 अनुष्का यशवंत बिराजदार हिच्यासह स्पर्धकांनी उस्फूर्तपणे अभिवाचन केले



































टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा