विज्ञान विश्वातील अगाध ज्ञानाचा अभ्यास करत समाजहिताचे संशोधक व्हा - सुलभा वठारे


विज्ञान केंद्र व संगमेश्वर कॉलेजच्या

 वतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन


सोलापूर प्रतिनिधी  

"महाविद्यालयीन जीवनात विज्ञान विश्वातील अगाध ज्ञानाचा अभ्यास करत समाजहिताचे संशोधक व्हा. त्यासाठी विज्ञान विषयांची पुस्तके वाचा. संशोधकांच्या कार्याची माहिती जाणून घ्या. त्यांचे संशोधन कार्यातील कष्ट आणि एकाग्रता यांचा अभ्यास करा. त्याचा आपल्याला भावी आयुष्यात उपयोग होतो." असे प्रतिपादन उपशिक्षण अधिकारी  सुलभा वठारे यांनी केले. त्या विज्ञान केंद्र आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी सचिव धर्मराज काडादी,प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील, सोलापूर सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकार विठ्ठल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. 




प्रारंभी सरस्वती पूजन करून उद्घाटन झाले. त्यानंतर कृषी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, जीवशास्त्र, संगणक, गणित, खगोलशास्त्र या विभागातून विद्यार्थ्यांच्या मॉडेल चे सादरीकरण झाले. दोन दिवसीय प्रदर्शनात ८५ संच विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. विभाग प्रमुख रामराव राठोड . चंद्रकांत हिरतोट, बाळकृष्ण कापसे,शुभदा कुलकर्णी ,लीना खमितकर, प्रशांत शिंपी, विज्ञान प्रदर्शन समन्वयक विश्वजीत आहेरकर ,रोहन डोंगरे , नागेश कोल्हे ,स्मिता शिंदे, प्रशांत पाटील, सिद्धाराम विजापुरे, प्राजक्ता चव्हाण, सुषमा पाटील, तुकाराम साळुंखे,  अभिजीत निवर्गीकर, विशाल जत्ती, रूपाली अंबुलगे, संगमेश्वर स्वामी, शंकर शितल,  स्नेहल खैरे, अश्विनी वाघमारे, मानसी काळे,  शिल्पा लबा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


फोटो ओळी-  संगमेश्वरच्या जिल्हास्तरीय विज्ञान  व चित्र  प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सचिव धर्मराज काडादी,प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील, सोलापूर सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकार विठ्ठल मोरे .

  संगमेश्वर कॉलेज व  विज्ञान केंद्र सोलापूर आयोजित

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातली काही क्षणचित्रे



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा