राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कलादालन व वस्तुसंग्रहालय व्हावे ------ धर्मराज काडादी


महाराष्ट्र शासन सांस्कृतिक धोरणाविषयीच्या तज्ज्ञांची सभा संपन्न

सोलापूर (दिनांक १८  एप्रिल ) ''सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कलादालन व वस्तुसंग्रहालय व्हावे तसेच शालेय स्तरावरील मुलांसाठी राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत''  असे मत धर्मराज काडादी यांनी मांडले. ते काल महाराष्ट्र शासन सांस्कृतिक धोरण विषयक तज्ज्ञ समितीच्या सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये ही सभा संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपीठावर राज्य शासन सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य माजी प्राचार्य चित्रकार जी.एस. माजगावकर (कोल्हापूर) चित्रकार सुनील महाडिक ( मुंबई ) राज्य शासनाचे प्रतिनिधी प्रा. डॉ. गणेश तरतरे, कला व्यवसाय केंद्राचे माजी प्राचार्य गोपाळ डोंगे, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर,  संगमेश्वर रात्र महाविद्यालय प्राचार्य श्रीनिवास गोठे यांची उपस्थिती होती.


                   प्रारंभी प्रा.सचिन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले या त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासंदर्भात शासनाने गठित केलेल्या समितीचा उद्देश सांगून सभेचा हेतू स्पष्ट केला. प्रमुख अतिथींचा सत्कार कर्मयोगी कै.आप्पासाहेब  काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर राज्य शासन समितीतील तज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले.  मनोगतानंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कलाप्रेमी चित्रकार कला शिक्षकांशी समितीने संवाद झाला. यात रामचंद्र हक्के, भंवर राठोड, चित्रकार नितीन खिलारे, रामचंद्र हक्के, यांनी काही सूचना मांडल्या.

राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षकाची नोंदच नसल्याने कला शिक्षकाची भरती २०१२  पासून बंद असल्याने त्वरित सुरु करावी. यापूर्वी आम्ही वारंवार निवेदने दिली आहेत. ---  संतोष धारेराव

 राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा विचार करूनप्राथमिक स्तरावरील शिक्षणात कलेचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे.----विनायक घाटगे 

सोलापूरला कलेची मोठी परंपरा आहे. इथल्या कलाकारांच्या कलाकृतींचे जतन व्हावे. त्यांची नोंद राहावी यासाठी प्रयत्न व्हावेत.कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या स्थानिक कलासंस्थांना उर्जित अवस्था मिळण्यासाठी अनुदान मिळावे.  -----विठ्ठल मोरे 

                    चित्र, शिल्प, संग्रहालयाविषयीच्या  विविध सूचना शासन दरबारी पोहोचवणार असल्याचे आश्वासन अभ्यासा समितीने यावेळी दिले. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत धर्मराज काडादी यांनी व्यक्त केले. शेवटी प्रा. डॉ.नरेंद्र काटीकर यांनी संगमेश्वर संस्थेने ही सभा आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले असे सांगत सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रेया माशाळ यांनी सूत्रसंचालन केले . या बैठकीस सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिल्पकार, चित्रकार, कलाशिक्षक भारत गदगे (पंढरपूर),  चित्रकार  शिरीष घाटे, चित्रकार संजय नोरा, शांतप्पा काळे,देवेंद्र निम्बर्गीकर , पुष्कराज गोरंटला,दीपक कन्ना,सुरेश मल्लाव, अनिल रॉय,शशिकांत मोटगी, शिल्पकार रामपुरे, शिल्पकार अमर कनकी, शिल्पकार चंद्रकांत गंजी,कला व्यवसाय केंद्राच्या प्राचार्य प्रतिभा धोत्रे यांच्यासह कलाप्रेमी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सभा यशस्वीतेसाठी प्रा.मीनाक्षी रामपुरे,  प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ यांनी परिश्रम घेतले.

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा