कर्मयोगी अप्पासाहेब जयंती.... आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित वक्तृत्व, रंगभरण व पत्रलेखन स्पर्धा संपन्न
मुलांना आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या
- अभियंता अर्चिता ढेरे
सोलापूर ( शहर संचार दिनांक १६ ) '' पालकांनो सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे आहे प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत सामील होताना मुले मशीन न होता माणूस कसे बनतील याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. गुणवत्तेसाठी स्पर्धा जरूर करावी. मात्र त्याचा अतिरेक न करता मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या .ती नक्कीच यशस्वी बनतील.'' असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या अभियांत्रिकी विभागप्रमुख अर्चिता ढेरे यांनी केले. त्या आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित आंतरशालेय रंगभरण, वक्तृत्व आणि पत्रलेखन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये होतात. याप्रसंगी व्यासपीठावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्या शितल काडादी, प्राचार्या प्रियंका समुद्रे , परीक्षक संजीव समन, इमरान सय्यद ,शिवराज देसाई,श्यामसुंदर माने, अश्विनी बिराजदार ,मानसी झळकेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी आप्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या तसेच परीक्षकांचा सत्कार झाला. आकाशवाणीच्या माध्यमातून मातृभाषेच्या वैविध्यपूर्ण माहिती मनोरंजनाच्या बाबी शिकायला मिळतात. असे सांगत ढेरे यांनी विद्यार्थी स्पर्धक, पालकांशी अदिलखुलास संवाद साधला.
निकाल याप्रमाणे ------------रंगभरण स्पर्धा (गट - एलकेजी युकेजी) प्रथम क्रमांक - युवनाते उन्नती उमेश (दमाणी विद्यामंदिर ) द्वितीय क्रमांक - जगताप श्रावणी विवेक (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल) तृतीय क्रमांक - बालिंगल जान्हवी राघवेंद्र (प्रिसिजन स्कूल )
गट पहिली
दुसरी- प्रथम क्रमांक - जमखंडी
कलाश्री मल्लिनाथ ( दमाणी विद्यामंदिर )
द्वितीय क्रमांक - कमटम श्रीवंदना गिरीश ( महेश इंग्लिश स्कूल ) तृतीय क्रमांक - एलदी वेदांत संजय ( वेलेंटाईन
सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल )
इयत्ता
तिसरी चौथी ( चित्रकला आणि रंगभरण )
प्रथम क्रमांक- पोपळकर पियुष सतीश ( दमाणी
विद्यामंदिर ) द्वितीय क्रमांक - गावडे
नागेश रमेश (गांधीनाथा रंगजी
हायस्कूल) तृतीय क्रमांक - खान अनस
इम्तियाज ( रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल )
पत्रलेखन स्पर्धा इंग्रजी मराठी - गट इयत्ता पाचवी सहावी
- प्रथम क्रमांक - कामलीवाले उम्मेहनी
( संगमेश्वर पब्लिक स्कूल) द्वितीय
क्रमांक - जमादार सफा (संगमेश्वर पब्लिक स्कूल ) तृतीय क्रमांक - चौगुले अक्षरा (
दमाणी विद्यामंदिर )
इयत्ता
सातवी आठवी - प्रथम क्रमांक - सुरवसे दिग्विजय शक्तीसागर ( दिगंबर जैन गुरुकुल
प्रशाला ) द्वितीय क्रमांक - पाटील भार्गव
योगिनाथ( दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला )
तृतीय क्रमांक - हुल्ले प्राची
अशोक ( सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल )
गट इयत्ता नववी दहावी - प्रथम क्रमांक - बिराजदार साक्षी ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय
क्रमांक - घोडके कार्तिकी गजेंद्र (
सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) तृतीय
क्रमांक - समृद्धी बताले ( दमाणी प्रशाला
)
वक्तृत्व स्पर्धा गट
इयत्ता पाचवी सहावी- प्रथम
क्रमांक - आलदर समृद्धी अविनाश ( एस.आर. चंडक इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय क्रमांक - पाटील केदार महेश ( शरदचंद्र
पवार प्रशाला, सोलापूर) तृतीय क्रमांक - रेवा गांधी ( संगमेश्वर पब्लिक स्कूल )
गट
इयत्ता सातवी आठवी - प्रथम क्रमांक
- मोरे अस्मिता सुरेश ( शरदचंद्र पवार
प्रशाला ) द्वितीय क्रमांक - झेंडेकर
समिधा नारायण ( सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल ) तृतीय क्रमांक - राठोड कृष्णा कांतु
( ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर )
गट
इयत्ता नववी दहावी - प्रथम क्रमांक - चव्हाण नक्षत्र मुकेश ( एस.आर.इंग्लिश
मीडियम स्कूल ) द्वितीय क्रमांक - पवनी नितीन हिबारे ( एस.आर.इंग्लिश मीडियम स्कूल
) तृतीय क्रमांक - यळमेली वैष्णवी हनुमंत ( सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल )
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वीणा अन्नलदास, मेहजबीन सय्यद, हरीश पुठ्ठा, सुरज दिंडोरे, शोभा गोटे , सांस्कृतिक विभागातील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रीती दुलंगे यांनी केले तर आभार उमाअश्विनी नारा यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा