संगमेश्वरच्या वाणिज्य प्रश्नमंजूषेत जान्हवी आणि आयेशा प्रथम

 

 महाविद्यालयीन युवकांनी उद्योग विश्वातील नवतंत्रज्ञान जाणावे    सीए सौरभ कोठारी
सोलापूर  ( दिनांक २० )  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग वाणिज्य शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या 'बिझनेस क्वीझ २०२३' मध्ये संगमेश्वरच्या जान्हवी रोणे, आयेशा इनामदार यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक गणेश आंदोडगी, सुजय बोरना हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघाने पटकाविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक - आर्यन जाजू, श्रावण खडलोया ( हिराचंद नेमचंद  कॉलेज ऑफ कॉमर्स ) द्वितीय उत्तेजनार्थ -   सचिन सणके, बाळू गुत्तीकोंडा ( कुचन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर) उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक - आदित्य पोटाबत्ती, वैष्णवी सगरशेट्टी  ( दयानंद कॉलेज ,सोलापूर) यांनी मिळवला. प्रमुख पाहुणे सीएस सौरभ कोठारी,  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य व श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी यांच्या हस्ते या विजेत्यांचा रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन  गौरव करण्यात आला. याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे ,वाणिज्य विभागप्रमुख बसय्या हणमगाव आदी मान्यवर उपस्थित होते.

                             याप्रसंगी बोलताना सीए सौरभ कोठारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  '' उद्योग विश्वात नवतंत्रज्ञान येत आहे, त्यामुळे त्याचा स्वीकार करून तरुणांनी  उद्योग उभा केला पाहिजे . कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर आज जगात  उद्योग विश्व  झपाट्याने विकसित होत आहे.  त्यामध्ये आपणही  सहभागी होताना यातील नवतंत्रज्ञाचा  स्वीकार करावा लागेल.''   आपल्या मनोगतात पुष्पराज काडादी यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.  



                  एकूण 160 पेक्षा अधिक संघांनी या  प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.  प्रथम  लेखी परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेनंतर  निकाल घोषित करण्यात आला,  २० संघांची  निवड दोन विभागात करण्यात आली. त्यातून अंतिम संघात  या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  वाणिज्य शाखेशी निगडित अशा आणि सीए, सीएस. , सीएमए  या क्षेत्रातील प्रश्नांसह  सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले गेले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.गणेश मुडेगावकर, शिवराज देसाई,  श्रीमती एस. आर. नाईक  यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक व  व्यवस्थापन  विभागातील ऋतुजा गवळी , गौरी भादुले, मैथिली रंगरेज, शोभा गाडे, राघव कटकधोंड या विद्यार्थ्यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अनिता अलकुंटे,  तानाजी घाडगे,  बाबासाहेब सगर,संतोष पवार, गौरव जुदगार  , रूपाली पाटील ,रवींद्र बिराजदार,  सायबण्णा निबर्गी, राज मळेवाडी , पी. पी.अवधानी,निनाद सपकाळ, निखिल काळे आदींनी परिश्रम घेतले. तेजश्री तळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे  सुत्रसंचलन केले.  












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा