विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते ----- राहुल बुऱ्हाणपुरे



 वालचंदच्या ओंकार लांगळेच्या उपकरणास प्रथम क्रमांक 


  सोलापूर ( दिनांक 22  )"विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते; महाविद्यालयीन जीवनात अशा  प्रकल्प प्रदर्शनातून  नक्कीच उद्याचे  संशोधक घडतील असा विश्वास वाटतो '' असे मत टाटांच्या गाड्यांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी ऑटोमोबाईल पार्ट बनवणारे सोलापूरचे युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे यांनी  व्यक्त केले. ते सायन्स सेंटर सोलापूर आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य  ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, परीक्षक ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्राचार्य जे. डी. जाधव, प्रा.धनंजय शहा, प्रा. पी. ए. येळेगावकर , प्रा.डॉ.नागेश नकाते आदी मान्यवर उपस्थित होते. 




प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर  प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यानंतर राहुल बुऱ्हाणपुरे यांचे मनोगत झाले . त्यानंतर  कृषी हवामान शास्त्रज्ञ प्राचार्य जे. डी.जाधव यांनी विद्यार्थ्यांशी हवामान खाते, मिलेटस,तृणधान्य आणि त्यांचे महत्व याविषयी दिलखुलास संवाद साधला. प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.




  निकाल याप्रमाणे -  प्रथम क्रमांक -  ओंकार सचिन  लांगळे ( वालचंद महाविद्यालय )  द्वितीय क्रमांक-   प्रतीक्षा  वाघमारे ,भाग्यश्री  बेळगी ( संगमेश्वर कॉलेज ) तृतीय क्रमांक -   दर्शन गोडसे, प्रथमेश झोंबाडे  उत्तेजनार्थ बक्षिसे - श्वेता सलगरे, संजना बिराजदार,  वैभवी भरमगोंडे, अश्विनी दिघे, ओंकार माळी,  हर्षद  केमशेट्टी,अपेक्षा कांबळे, साक्षी पाटील, सानिया अत्तार ( संगमेश्वर कॉलेज ) तेजस देडे (स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज ) सुरज कोंडा, विनोद गड्डम ( एसईएस पॉलिटेक्निक ) आदित्य शिंदे ,अनिरुद्ध गायकवाड, अर्णव जवरे ( ए. डी. जोशी ज्युनिअर कॉलेज )साईना हिमोणे, सृष्टी शिंदे, संजना सोनकडे, हर्षाली साळुंखे  (संगमेश्वर कॉलेज ) .


परीक्षकांनी परीक्षण निकष सांगत नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  याप्रसंगी  विज्ञान  विभागप्रमुख विशाल जत्ती,  विज्ञान प्रकल्प समन्वयक रोहन डोंगरे, विश्वजीत आहेरकर  यांच्यासह  विज्ञान शाखेतील शिक्षक बाळकृष्ण कापसे,शुभदा कुलकर्णी , प्रशांत शिंपी, सुभाष पाटील,स्मिता शिंदे, नागेश कोल्हे,संतोष पवार, प्राजक्ता चव्हाण, सुषमा पाटील, तुकाराम साळुंखे, अभिजीत निवर्गीकर, प्रियंका पाटील,श्रृती तुळशेट्टी, प्रशांत पाटील, सिद्धाराम विजापुरे, संगमेश्वर स्वामी, शंकर शितल,  स्नेहल खैरे, मानसी काळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले तर आभार रूपाली अंबुलगे यांनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे