संगमेश्वरच्या त्वरीता खटकेची एनसीसी नॅशनल एयर रायफल स्पर्धेसाठी निवड


दैनिक संचार परिवार आणि कॉलेजच्या वतीने सत्कार 

सोलापूर ( दि.२० जुलै २०२४) जुलै मध्ये तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे एनसीसी विभागाच्या वतीने झालेल्या एयर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या 9 महाराष्ट्र एनसीसी बटालियनची कॅडेट सार्जंट त्वरिता खटके ही सहभागी झाली होती.पुढे इंदोर ,मध्य प्रदेश येथे होणाऱ्या जी.वी. माळवणकर नॅशनल एयर रायफल स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल बोलताना त्वरिता म्हणाली'' मी मुळातच  खेळाडू असल्याने  या खडतर वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये मनापासून काम करत राहिले. हे यश  मिळवताना मला मिळालेले गुरु आणि माझे आई वडील यांच्या पाठबळामुळे हे शक्य झाले''


एप्रिल २०२४  पासून जवळपास सहा शिबिरातून व प्रशिक्षणातून तिची निवड झाली आहे. आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा आणि तिच्या मातोश्रींचा संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.श्री.शरणराज काडादी, दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी,प्रा.डॉ.दत्तकुमार म्हमाणे,प्रा.डॉ.वंदना पुरोहित  डॉ. दिपाली करजगीकर ,प्रा.डॉ. शिवाजी म्हस्के, प्रा.डॉ.मंजू संगेपाग, प्रा.विष्णू विटेकर डॉ. आनंद चव्हाण,  प्रा.डॉ. अण्णासाहेब साखरे ,प्रियंका पाटील, संतोष पवार, एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन शिल्पा लब्बा, सीटीओ प्रा. तुकाराम साळुंखे यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच 9 महाराष्ट्र बटालियनचे लेफ्टनंट कर्नल शरद बाबर, सुभेदार मेजर गनबहादुर गुरुंग आणि सर्व पी.आय स्टाफ यांचे तिला मार्गदर्शन मिळाले

                त्वरिता खटके हीची आंतरराष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेसाठी भाग घेण्याची इच्छा आहे. यापूर्वी 2021 साली भोपाळ ,मध्य प्रदेश येथे राष्ट्रीय रायफल स्पर्धेसाठी निवड झाली होती.तसेच 2023 मध्ये  थल सैना  कॅम्प व आर डी सी कॅम्प यासाठीही तिची विभागीय स्तरावर निवड झालेली होती.त्वरिता खटके ही जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत तसेच जिल्हास्तरीय स्विमिंग स्पर्धेमध्येही तिचा सहभाग नोंदवलेला आहे. खटके आजपर्यंत तीन वेळा रायफल शूटिंगसाठी राष्ट्रीय स्तरावर तिची निवड झालेली आहे त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. सध्या ती संगमेश्वर कॉलेजमध्ये बीए भाग एक व एनसीसीच्या तृतीय वर्षासाठी शिक्षण घेत आहे.








    विद्यार्थी मित्रांनो नमस्कार

संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी

  नॅशनल एअर रायफल शूटिंगसाठी निवड झालेल्या

 कॅडेट त्वरिता खटके हिच्याशी कोमल बन्ने यांनी साधलेला संवाद

 त्या मुलाखतीचे दोन लिंक

भाग १  https://youtu.be/aTIpBEx4QWU?feature=shared

आणि २  https://youtu.be/qyRMnjaYG70?feature=shared

आपल्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे