प्राचीन भारतीय सांस्कृतिक परंपरा,वैद्यक ज्ञान संस्कृतमधून समजते सौ. शिल्पा कुलकर्णी
संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप
सोलापूर ( दिनांक १ ) प्रतिनिधी - '' संस्कृत भाषेतून वाणी संस्काराबरोबरच इतर भाषांचा देखील विकास होतो. प्राचीन भारतीय सांस्कृतिक परंपरा,वैद्यक ज्ञान संस्कृतमधून समजते.त्यामुळे आपण संस्कृतीतील सुभाषिते, कविता आणि ग्रंथ वर्षानुवर्षे वाचत आलो आहोत. या भाषेतील ज्ञान अगाध असून आयुर्वेदशास्त्रापासून सर्वच शास्त्रांना संस्कृत भाषा मदत करत आली आहे '' असे प्रतिपादन सौ. शिल्पा कुलकर्णी दीक्षित यांनी केले.त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित संस्कृत संभाषण वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा. उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.
संस्कृत संभाषण वर्ग दिनांक 8 जुलै ते 31 जुलै कालावधीत संपन्न झाला एकूण तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचा समारोप नुकताच संपन्न झाला .समारोप सत्रात मध्ये संभाषण वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत आणि अभिव्यक्ती सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले कु.वाणीश्री सज्जन यांनी कालिदासो जने जने संस्कृत गीत सादर केले. वैभव नल्ला यांनी मानवी अवयवांचे संस्कृत शब्द व स्व मनोगत व्यक्त केले. सौ.राणी दराडे यांनी समय सारणी संस्कृत मधून सांगितली . कु.रेवती पवार आणि कु. नेहा व्हदलुरे यांनी संस्कृत भाषेतून संभाषण संवाद सादर केला . श्री.अरविंद लोणी यांनी स्वमत व सुभाषित गायन केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी सौ शिल्पा कुलकर्णी दीक्षित यांनी भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये संस्कृत भाषेचे महत्व आणि भरत नाट्यम् याचा संस्कृत विषयाचा संबंध विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडला. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले . उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी उपस्थितासमोर संस्कृत सुभाषित सादर करून वर्ग आयोजनबद्दल कौतुक केले पुढील वर्ग नियोजांबद्दल शुभेच्छा दिल्या.या प्रकारच्या संस्कृत संभाषण वर्गासह कन्नड आणि तेलगू संभाषण वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे, इंग्रजी संभाषण वर्ग दिनांक 8 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहितीसाठी भाषा संकुल समन्वयक श्री दत्तात्रेय गुड्डेवाडी (+919923970083) यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौजागिरी महिंद्रकर या विद्यार्थिनीने केले याप्रसंगी सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे कॉलेजचे भाषा संकुलाचे समन्वयक प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी, डॉ.गणेश मुडेगावकर, प्रा.संतोष पवार संस्कृत संभाषण वर्गशिक्षक प्रदीप आर्य उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा