मार्गदर्शनानुसार संच मान्यता झाल्यास अडचणी दूर होतील डॉ.ज्योती परिहार ( सोळंकी )


 संगमेश्वरमध्ये  कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेचे वाटप

 सोलापूर दिनांक ७ - '' विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ या वर्षाकरिता कार्यालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संच मान्यता पूर्ण केल्याने कनिष्ठ महाविद्यालयाच्या अडचणी दूर होतील. कारण विद्यार्थी संख्या, रिक्त शिक्षक पदे, वेतन पथक यांच्याशी निगडित ही तांत्रिक बाब असल्याने महाविद्यालयाच्या प्रशासनाने ती व्यवस्थित करून आणून दिल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते.ज्या संचमान्यता बिनचूक पूर्ण झाल्या आहेत त्यावर स्वाक्षरी होऊन ज्या त्या महाविद्यालयांचा पुढचा मार्ग मोकळा केला आहे. विशेष म्हणजे वेळोवेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या मार्फत परिपत्रकाद्वारे अनुपस्थित कनिष्ठ महाविद्यालयांना उपस्थित राहून संच मान्यता पूर्ण करण्यासाठी एकूण तीन वेळा संधी देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष शिबीरही लावण्यात आले. मात्र ज्या कनिष्ठ महाविद्यालयाने अनुपस्थिती दाखवली आणि त्रुटी दूर केल्या नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा सूचना देऊन वेळोवेळी त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे.'' असे प्रतिपादन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुण्याच्या सहसंचालक डॉ. ज्योती परिहार (सोळंकी) यांनी केले.



                                         त्या संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ज्युनिअर कॉलेजच्या संच मान्यतेच्या वाटप कार्यक्रमांमध्ये बोलत होत्या. यावेळी संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रसाद कुंटे,   उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण निरीक्षक स्मिता नडीमेटला, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील योगेश सुरवसे, प्रशांत नेटवटे, गोकुळ टकले, सागर सोनवणे यांच्यासह कार्यालयाच्या परिक्षेत्रातील प्राचार्य, शिक्षक , कर्मचारी उपस्थित होते.

          विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४ -२५   या वर्षाकरिता अंशतः अनुदानित, अनुदानित, विनाअनुदानित / स्वयंसहित महाविद्यालय सोडून सर्व प्रकारच्या महाविद्यालयांच्या संच मान्यता कार्यालयाच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे वाटप करण्यात आल्या. या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत शिबिराचे आयोजन यापूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास प्राप्त संच मान्यतेच  तपासणी करून अंतिम करण्यात आलेल्या संच मान्यता संगमेश्वर कॉलेजच्या ग्रंथालय इमारतीतून नियोजित वेळेत सकाळी ९ ते संध्याकाळी ७.३० या वेळेत वाटप करण्यात आल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून  व्यवस्थित नियोजन केले होते. वेळेत संच मान्यता मिळाल्याने कनिष्ठ महाविद्यालयाच्या  प्राचार्य,शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के