कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात उत्तम करिअर -सीए अतुल कुलकर्णी


माझं करिअर अंतर्गत - करिअर इन सीएस हा कार्यक्रम


 सोलापूर प्रतिनिधी - '' आजच्या आधुनिक काळात शिक्षण व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये कंपनी सेक्रेटरी (CS) हे क्षेत्र अत्यंत प्रतिष्ठेचे व जबाबदारीचे मानले जाते. कंपनी सेक्रेटरी हा एखाद्या कंपनीसाठी कायदेशीर मार्गदर्शक व सल्लागार म्हणून काम करतो.कंपनी सेक्रेटरी कोर्स The Institute of Company Secretaries of India (ICSI) मार्फत चालवला जातो. या कोर्ससाठी प्रथम CSEET परीक्षा, त्यानंतर Executive व Professional या टप्प्यांतून विद्यार्थी प्रगती करतो. तसेच आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यावर तो प्रमाणित कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो.कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात उत्तम करिअर आहे.'' असे प्रतिपादन सीए अतुल कुलकर्णी यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आयोजित माझं करिअर अंतर्गत करिअर इन सीएसया कार्यक्रमात बोलत होते.

मार्गदर्शक सीए अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ' कंपनी सेक्रेटरी ' बद्दल  सविस्तर मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले ,'' कंपनी सेक्रेटरीची मुख्य जबाबदारी म्हणजे कंपनीने कायदे, नियम व सरकारी अटींचे पालन करणे, बोर्ड मिटिंग्सचे कागदपत्र तयार करणे, शेअर मार्केट व सेबीसंबंधित नियम पाळणे तसेच कंपनीला योग्य सल्ला देणे.या क्षेत्रात प्रॅक्टिसिंग CS, मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी, बँकिंग व वित्तीय संस्था, तसेच सरकारी संस्थांमध्येही विपुल संधी आहेत. सुरुवातीस चांगला पगार मिळतो आणि अनुभव वाढल्यावर उत्पन्न खूप जास्त होते. म्हणूनच, ज्यांना कायदे, अकाउंट्स व कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये रस आहे, त्यांच्यासाठी कंपनी सेक्रेटरी हे क्षेत्र उज्ज्वल व स्थिर करिअरचे दार उघडणारे ठरते. 

उपप्राचार्य  प्रसाद कुंटे आणि  पर्यवेक्षक डॉ. प्रा.श्री मल्लिनाथ  साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.पाहुण्यांचा परिचय डॉ. रूपाली पाटील यांनी करून दिला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे सत्कार झाला. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वाणिज्य  विभागाचे समन्वयक  प्रा. बाबासाहेब सगर ,डॉ.प्रा. रुपाली पाटील,प्रा.जुगदार सर आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन प्रा. संगीता म्हमाणे  आणि आभार  प्रा. गौरव जुगदार यांनी मानले.




 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के