कर्मयोगीअप्पासाहेब काडादी जयंती I राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत सातारचा माने प्रथम

 

सोलापूर (दिनांक १५)

दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितकर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११६ व्या जयंती प्रीत्यर्थ महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उनाड पाऊस, शिक्षण याचे नाव,अध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील आपले विषय  वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सिद्धेश्वर प्रशालेचे प्राचार्य संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे संतोष पाटील यावेळी बोलताना म्हणाले की,''  अप्पासाहेबांचे व्यक्तिमत्व अत्यंत दूरदृष्टीचे बहुआयामी होते. सहकार, शिक्षण, राजकारण आणि समाजकारण  करत असताना  निष्पृह वृत्तीने त्यांनी  काम केले. काळाची पावले ओळखून कर्मयोगी अप्पासाहेबांनी सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही बाब ओळखली आणि  शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची दालने उघडी करून दिली. आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन त्यांचा होता.गोरगरिबांची मुले शिकावित ते उच्चशिक्षित व्हावीत या हेतूने त्यांनी या शिक्षण संस्था उभ्या केल्या. त्यावेळच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अत्यंत गुणी माणसे त्यांनी शोधली.त्यांना  सोलापूरच्या भूमीत शैक्षणिक कार्य करायला लावले त्यांना कौटुंबिक जिव्हाळ्याने जपले. संगमेश्वरला मिळालेल्या प्राचार्यांपैकी ऑक्सफर्ड विद्यापीठापासून ते शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंपर्यंतके. ईश्वरन, के.भोगीशियना अशी बहुआयामी विद्वत्तासंपन्न माणसे अप्पांमुळे निर्माण झाली. असे मी मानतो.''

 अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी संगमेश्वर कॉलेजच्या गतकाळातील आठवणींना उजाळा देत कर्मयोगी अप्पांच्या कार्याच्या कार्याचा धांडोळा घेत राजकीय आठवणी सांगितल्या.

निकाल

प्रथम -   प्रथम क्रमांक - मिथुन दत्तात्रय माने ( सी.बी.एस. कॉलेज, सातारा ) द्वितीय क्रमांक - समर्थ रमेश बंडगर (डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पुणे )  तृतीय क्रमांक -  क्षितिजा भाऊराव  गायकवाड ( बी.पी.सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स, बार्शी )  उत्तेजनार्थ  -  संकेत कृष्णात पाटील  (शिवराज महाविद्यालय ,गडहिंग्लज ) उत्तेजनार्थ -  नम्रता चव्हाण ( बी.पी. सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स , बार्शी)  या विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्रासह पारितोषिके -प्रथम क्रमांक - ५००१ रुपये, द्वितीय क्रमांक – ३००१ रुपये,तृतीय क्रमांक – २००१ रुपये,उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके देऊन गौरव करण्यात आला.


          प्रारंभी संगमेश्वर कॉलेजच्या आवारात झालेल्या उदघाटन सत्रात सकाळी नऊ वाजता कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले.दैनिक संचार चे उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रा.संतोष पवार यांनी  प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.उपस्थित परीक्षक प्रा. कवी गिरीश दुनाखे आणि प्रा.रेश्मा सुर्वे यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी,उप्राचार्य पर.डॉ.साहेबगौडा पाटील, स्पर्धा समन्वय प्रा. डॉ. सुहास दहिटणेकर, कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे विनोद बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली.

स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा.डॉ. शीला रामपुरे,डॉ. मंजू संगेपाग,प्रा.शिवराज पाटील ,प्रा.डॉ.विलास पाटील,  प्रा.संगीता म्हमाणे, रविशंकर कुंभार आदींनी सहकार्य केलं तर तंत्र सहाय्यक म्हणून संतोष फुलारी यांनी सहाय्य केले.सादरीकरणानंतर शेवटी निकाल घोषित केला. गेला. या वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा.प्रवीण राजगुरू यांनी केले तर उदघाटन आणि निकाल सत्राचे सूत्रसंचालन करून आभार प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी मानले























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी