राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ताऱ्यांचा आम्हाला अभिमान --- धर्मराज काडादी


खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी

 खेळाडूंचा कॉलेजच्या वतीने सत्कार

सोलापूर -  '' कॉलेज स्तरावर वैविध्यपूर्ण क्रीडा प्रकारात संगमेश्वरचे विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात. त्यानंतर पुढील टप्पा विद्यापीठ, विभाग असे करत करत राज्य आणि राज्याचे प्रतिनिधित्व करतात. राज्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर पदक घेऊन येतात. ही परंपरा खूप जुनी आहे. या परंपरेला साजेसे असे काम करणाऱ्या या क्रीडांगणावरील ताऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  मी त्या सर्व क्रीडांगणावरील ताऱ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो ''  असे गौरव उद्गार संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी काढले. ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते.

 कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी-- १ विनीत दिनकर -  राज्यस्तरीय अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत गोल्डन मॅन.  नांदेड येथे झालेल्या क्रीडा महोत्सव स्पर्धेमध्ये विनीत दिनकर यांनी तीन सुवर्णपदक पटकावले.100 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, 200 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक तसेच 400×100 मीटर रिले सुवर्णपदक. २ श्रद्धा दिवटे - खेलो इंडिया स्पर्धेमध्ये 10 मीटर रायफल शूटिंग मध्ये कांस्यपदक मिळविले सोलापूर विद्यापीठातील रायफल शूटिंग. 10 मीटर स्पर्धेमध्ये खेलो इंडिया प्रथमच निवड झाली व त्यामध्ये आपल्या विद्यापीठाला कांस्यपदक मिळवून देण्यात हीचा सिंहाचा वाटा आहे. ३ आकृती सोनकुसरे - खेलो इंडिया मध्ये कॉलेज साठी दुसरे सुवर्णपदक मिळवून देणारी कन्या .शालेय राष्ट्रीय  लॉन टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर खेलो इंडिया साठी निवड झाली व त्या स्पर्धेमध्ये तिने उत्तम कामगिरी करत दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचे व आपल्या कॉलेजचे नाव उंचावले .४ विपुल कुडक्याल - राष्ट्रीय शालेय 1 मी स्प्रिंग बोर्ड डायविंग स्पर्धेमध्ये विपुल याने कांस्यपदक पटकावले. ड्रायव्हिंग मधील गत वर्षीची कामगिरी  कायम ठेवत महाराष्ट्राला व आपल्या कॉलेजला पदक प्राप्त करून दिले. ५ कांचन चौगुले -  इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेमध्ये  उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठास रोप्य पदक (सिल्वर मेडल) मिळवून दिले. ग्वाल्हेर येथे झालेल्या अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून ऑल इंडिया साठी आपली निवड केली होती. ऑल इंडिया स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करत खेलो इंडिया साठी पात्र ठरले व नुकताच खेलो इंडिया स्पर्धेस सहभागी झाले. ६ शर्वरी  वाघमोडे - इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेमध्ये  उत्कृष्ट कामगिरी करत विद्यापीठास रोप्य पदक (सिल्वर मेडल) मिळवून दिले. ग्वाल्हेर येथे झालेल्या अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळून ऑल इंडिया साठी आपली निवड केली होती. ऑल इंडिया स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी करत खेलो इंडिया साठी पात्र ठरले व नुकताच खेलो इंडिया स्पर्धेस सहभागी झाले.७ तनुजा पवार - खेलो इंडिया तायक्वांदो सुवर्ण पदक.

प्रारंभी प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी या क्रीडा स्पर्धेची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर विजेत्या क्रीडापटूंची माहिती देत शारीरिक शिक्षण संचालक डॉ.आनंद चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना सत्कारासाठी पाचारण केले. संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांचे सत्कार झाले. विक्रांत विभुते यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष खेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी, प्रा. डॉ.साहेबगौडा,पाटील, प्रा. डॉ. राजकुमार मोहरकर, शिवराज पाटील, राहुल कराडे,संतोष पवार,सिटीओ तुकाराम साळुंखे, डॉ.नागेश कोल्हे यांच्यासह एनसीसी विद्यार्थी आणि  विद्यार्थी, शिक्षक,उपस्थित होते.












https://youtu.be/UIpNEO3shgI?si=WsPjfQ-N-4YaqMpB 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी