जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन,सामान्य ज्ञानासह विविध स्पर्धांचे आयोजन
![]() |
सोलापूर दिनांक १९ - संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने दिनांक 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी अनुक्रमे जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन ( दि २२,२३ ),बिझनेस क्विझ (दि २२ ),सामान्य ज्ञान स्पर्धा (दि २३ ) ,सुलेखन व अभिवाचन ( दि २४ ) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय, शेतकी महाविद्यालयामधीलविद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे यंदाचे हे नववे वर्ष असून शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
२२ डिसेंबरला वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील स्थित्यंतरे, या क्षेत्रातील आव्हाने यांची जाण व्हावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी. या उद्देशाने बिजनेस क्विझचे आयोजन करण्यात आले आहे. विविध महाविद्यालयातील संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी दहा वाजता ही स्पर्धा संगमेश्वर कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांसाठी रेल्वे बोर्ड, सरळ सेवा भरती, राज्यसेवा, पोलीस भरती, संघ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होताना कला शाखेतील अभ्यास किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेता यावे. या हेतूने इयत्ता नववी दहावीसाठी माध्यमिक गटातून, इयत्ता अकरावी बारावीसाठी उच्च माध्यमिक गटातून सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात येते .ही स्पर्धा २३ डिसेंबरला दुपारी बारा वाजता होईल. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ १०० प्रश्न, १०० गुण,९० मिनिटे वेळ असे यामध्ये नियोजन आहे. कला, क्रीडा साहित्य, संस्कृती, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य आर्थिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा या स्पर्धा परीक्षेत समावेश असेल.
भाषा संकुलाच्या वतीने प्रतिवर्षी वैविध्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन केले जाते. भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे तर लेखन कौशल्य आत्मसात केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास साधला जातो. हा विद्यार्थी केंद्र हेतू लक्षात घेऊन अभिवाचन आणि सुलेखन स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षेप्रमाणे यंदाही २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन वाचन, भाषण आणि संभाषण कौशल्य यांचा मूलभूत विकास व्हावा या हेतूने माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. २४ डिसेंबर रोजी ही स्पर्धा कॉलेजच्या आवारातील इमारतीत होईल.अशी माहीती संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे दिली.
![]() |





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा