मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' भित्तीपत्रकाचे उद्घाटन
मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये ' शब्दविणा ' भित्तीपत्रकाचे उद्घाटन
सोलापूर दिनांक १६
मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' या भितीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या हस्ते झाले.याप्रसंगीउपप्राचार्य डी. एम. मेत्री ,मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.सुहास पुजारी, डॉ.महादेव देशमुख, हिंदी विभाग प्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. दादासाहेब खांडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. साखरे, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहोरकर , डॉ. मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी भित्तीपत्रक तयार करण्यामागचा उद्देश विभागप्रमुखांनी सांगितला. त्यात ते म्हणाले की,'' मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतून झालेल्या शिक्षणातूनच आपण साहित्याच्या वाटा निवडत असतो. ती संधी मराठी विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. कॉलेजच्या वार्षिक अंकात देखील विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर पुरस्कार मिळवत असतात त्यामागे अशा उपक्रमांचे योगदान असते, म्हणून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात भाषेचे निगडित तसेच लेखन कौशल्यावर आधारित विविध उपक्रमात सहभागी व्हावे. त्यातून व्यक्तिमत्त्वाचा भाषिक कौशल्याचा सर्वांगीण विकास होतो.''
त्यानंतर भित्तीपत्रकाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर आपल्या मनोगतात प्राचार्यांनी भित्तीपत्रकासारखे उपक्रम भाषेच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांनी यामध्ये अवश्य सहभागी व्हावे तसेच आपल्या प्रज्ञा या वार्षिक अंकाच्या माध्यमातून देखील आपण सतत लिखाणासाठी तयार राहावे. असे आवाहन त्यांनी केले.
या दालनात कवी केशवसुत, इंदिरा संत यांच्या कविता, चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या यांचा समावेश आहे.अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची संकलित माहिती या देण्यात आली आहे.सुलेखन संतोष पवार यांचे आहे. छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सारीपुत्र तुपेरे डॉ.सारीपुत्र तुपेरे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी मराठी ,हिंदी, इंग्रजी या विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाची युट्युब लिंक : https://youtu.be/kTw3vUCyHVQ
मराठीच्या अस्सल कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या
https://www.marathimati.com या वेबसाईटला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा