खेळाडूंनी क्रीडा प्राविण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ताही सांभाळावी - राष्ट्रीय जलतरणपटू कविता चिट्टिअप्पा

 


 

संगमेश्वरचा 69 आणि 70 वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

सोलापूर,दि.28 जानेवारी : 

            विद्यार्थी जीवनामध्ये खेळाला महत्त्वाचे स्थान असते.  त्यामधून शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. खेळातून विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, शारीरिक विकास होतो.  असे असले तरी खेळाडूंनी मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे.  कारण यातून त्यांचा बौद्धिक विकास होतो, त्यांची गुणवत्ता वाढते ज्याचा उपयोग जीवनात यशस्वी होण्यासाठी पूरक ठरतो.  म्हणून प्रत्येक खेळाडूने क्रीडा प्राविण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ताही सांभाळावी असे विचार राष्ट्रीय जलतरणपटू कविता चिट्टिअप्पा यांनी व्यक्त केले.


            संगमेश्वर कॉलेजमध्ये 69 आणि 70 व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. ईरेश स्वामी, संस्थेचे सचिव मा. धर्मराज काडादी, मा. सौ. उमा काडादी,  प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, कै. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दिपक पाटील, जिमखाना प्रमुख प्रा. आनंद चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस मालप आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. सी.बी.नाडगौडा, आणि प्रमोद दर्गोपाटील इत्यांदींची विशेष उपस्थिती होती.




            कविता चिट्टिअप्पा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या जीवनाची यशोगाथा सांगितली.  त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील 31 वर्षांचे विविध अनुभव मांडले.   विशेषत: सोलापूरमध्ये शिक्षण घेताना संगमेश्वर कॉलेजमध्ये मिळालेले मार्गदर्शन, सोलापूरमधील पहिली महिला जलतरणपटू  हा बहुमान मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या.  खेळाडूंनी आत्मविशास व उपलब्ध आधुनिक साधने यांचा सहाय्याने प्रगती साधावी.  आपल्या जीवनामध्ये खेळाडूंनी कृतज्ञता, सर्जनशीलता, सकारात्मकता, सर्वांसमवेत आनंद साजरा करण्याची वृत्ती, इतरांशी तुलना न करणे, संयम बाळगणे, प्रेम व सहानुभूती इ. सूत्रांचा अंगीकार करावा असेही त्यांनी संगितले. संगमेश्वरची क्रीडा परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार्‍या खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.



            या कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर गीताने व कु. वैशाली आगलावे, कु. वैष्णवी व्हनकवडे यांच्या ईशस्तवनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. लीना खमीतकर यांनी करुन दिला. जिमखाना अहवाल व वरिष्ठ क्रीडा पारितोषिक यादी वाचन प्रा. आनंद चव्हाण यांनी केले. प्रा. विक्रांत विभूते यांनी कनिष्ठ विभाग तर प्रा. शरण वांगी यांनी संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोषिक यादीचे वाचन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना मार्गदर्शन करणार्‍या क्रीडाप्रशिक्षकांचा व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस मालप याने मानले. सूत्रसंचालन डॉ. आरती दिवटे, डॉ. पुष्पांजली मेत्री व प्रा.संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी मोठया संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 


(फोटो ओळ - बोलताना मा. कविता चिट्टिअप्पा, मंचावर मा. ईरेश स्वामी, मा. धर्मराज काडादी, उमा काडादी,  प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, प्राचार्य श्री. दिपक पाटील, प्रा. आनंद चव्हाण, श्रेयस मालप) 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा