विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे--- संगमेश्वर कॉलेजमध्ये आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
संचार प्रतिनिधी
• सोलापूर, दि. ६
विद्याथ्र्यांनी इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. इंग्रजीबरोबरच संगणक साक्षर व्हावे, परंतु अहंकाराचा वारा लागू देऊ नये, असा मौलिक सल्ला कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी दिला. सोमवारी, संगमेश्वर महाविद्यालयात महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवाकेंद्रित 'समृध्द महाराष्ट्राचा आवाज व्हा' या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, आरोग्य, औद्योगिक विकास, शेती, पर्यावरण, क्रीडा, मानसिक स्वास्थ्य, साखर कारखाना आदी विविध प्रश्नांबद्दल विद्यार्थ्यांची मते जाणून घेत त्यांना मनमोकळी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी त्यांनी सोलापूरची ओळख काय ? या प्रश्नाने संवाद साधण्यास माहिती सांगताना त्यांनी कुठलाही संकोच न करता आपण नववीपर्यंत शिक्षणात कसे कच्चे होतो आणि नंतर मात्र स्वतःहून कशी प्रगती साधली.
सुरुवात करून युवकांना बोलते केले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना हेरून त्याची योग्य उत्तरेही दिली. आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दलची जिल्हा परिषद सदस्य ते आमदार कसा झालो याबद्दलही त्यांनी दिलखुलासपणे सांगून विद्यार्थ्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांच्या मनावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली.
आपल्याकडे संधी मोठ्या प्रमाणात असली तरी चुकीच्या शिक्षण पध्दतीमुळे देशात ५० टक्के युवक बेरोजगार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना रोजगारपूरक शिक्षण देण्यासाठी राज्यकर्त्यांनी तसे धोरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच इंटरनेटचा वापर चांगल्या कामासाठी करा, शेतीला शेवटचा पर्याय म्हणून न बघता तिला प्राथमिकता द्या, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, इंग्रजीचा वापर करण्याबरोबरच संगणक वापराबाबत साक्षर व्हा, अहंकार येऊ देऊ नका, असे आवाहन करून स्त्री- -पुरुष समानता, कुपोषण, महिला धोरण, शेतकरी आत्महत्या, विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न, नद्याजोड प्रकल्प तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांगांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
तसेच तुम्ही देशाचे भविष्य असताना राजकर्ते तुमचे मत विचारात घेतात का? असा प्रश्न उपस्थित करून देशातील मूलभूत प्रश्नांवर मतदान करून युवा शक्तीने महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आमदार पवार यांनी केले. प्रारंभी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने संस्थेचे संचिव धर्मराज काडादी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, संचालक महादेव जम्मा, अॅड. शिवशंकर बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रमानंतर त्यांना शासकीय दिनेश शिंदे, प्रशांत बावर, वैद्यकीय महाविद्यालयातील परिवहनचे माजी सभापती विद्यार्थ्यांच्यावतीने त्यांच्या आनंद मुस्तारे, महाविद्यालयाचे विविध मागण्यांचे निवेदन प्रभारी प्राचार्य राजीव देसाई देण्यात आले. कार्यक्रमाचे. यांच्यासह विद्यार्थी मोठ्या सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी संख्येने उपस्थित होते.
एक मे रोजी बक्षीस वितरण
महाराष्ट्र व्हिजन फोरमतर्फे शेती, राजकारण, समाजकारण, शिक्षण यासह विविध १८ ते १९ विषयांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून मत घेऊन त्या-त्या विषयातील डॉक्युमेंटरी तयार केली जाणार असून विद्यार्थ्यांनी सुचविलेले उपायही त्यामध्ये असणार आहेत. याचे बक्षीस वितरण एक मे रोजी पुण्यात होणार असून यातील सर्वोत्कृष्ट १० डाक्युमेंटरीज सर्वपक्षीय नेत्यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हिजन म्हणून दिल्या जाणार आहेत.
सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी आमदार रोहित पवार यांनी विद्याथ्र्यांसोबत सेल्फी घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत संस्थेचे सचिव धर्मराज काडादी, पुष्पराज काडादी व अन्य
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा