जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे, प्रवीण याबाजी अव्वल
जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे,
प्रवीण याबाजी अव्वल
सोलापूर ( दिनांक ७ )
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मुख्य सत्र एकचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेनमध्ये संगमेश्वर
कॉलेजच्या देवांग नितीन देशपांडे (९६
.७०) प्रवीण अनिल याबाजी (९४.५६ )
पर्सेन्टाइल गुण मिळवून कॉलेजमधून अव्वल ठरले. सोमवारी रात्री उशिरा JEE
चा निकाल जाहीर झाला. jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in या दोन अधिकृत वेबसाइटवर JEE मुख्य निकालाच्या लिंक देण्यातआल्या
होत्या . ही परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आली
होती. NTA ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीच्या सत्र परीक्षेसाठी ९
लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
यशस्वी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात
आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य
शरणराज काडादी, प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,एसआयपी समन्वयक डॉ. गणेश मुडेगावकर,संतोष पवार यांनी अभिनंदन करून पुढच्या
परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा