समृद्ध जीवनशैलीसाठी परोपकारी निसर्गाचे महत्व ओळखा' -- डॉ.व्यंकटेश मेतन

नेचर वॉकच्या निमित्ताने संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांशी संवाद

 सोलापूर ( दिनांक १७ ) '' देतो तो निसर्ग राखतो तो माणूस या  उक्तीप्रमाणे देणाऱ्या निसर्गाचे अस्तित्व अबाधित राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. भविष्यातील समृद्ध जीवनशैलीसाठी परोपकारी निसर्गाचे महत्त्व ओळखा.'' असे सांगत सोमवारच्या प्रसन्न सकाळी निसर्गप्रेमी, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ , ( वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ) वन्यजीव छायाचित्रकार,पक्षी जगताचे अभ्यासक डॉ.व्यंकटेश मेतन यांनी  संवाद साधला. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग भूगोल विभागाच्या  वतीने आयोजित केलेल्या ' नेचर वॉक ' उपक्रमात बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी उपस्थित होते.

                                        प्रारंभी सर्व विद्यार्थी संमती कट्ट्याजवळ एकत्र जमले. त्यानंतर प्रा. डॉ.विठ्ठल अरबाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. मेहता यांनी विद्यार्थ्यांशी नेचर वॉक, हेरिटेज वॉक , मानवी जीवनशैली  या विषयावर संवाद साधला. विद्यार्थ्यांना परोपकारी समृद्ध निसर्गाचे महत्त्व सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी कॉलेजच्या वतीने सुरू केलेल्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या भविष्यात असेच विद्यार्थी केंद्री  उपक्रम राबवण्यात येतील असे सांगितले. त्यानंतर रात्र महाविद्यालयाच्या प्रा. सोनाली गिरी यांनी शिवयोगी सिद्धरामेश्वर परिसरातील मंदिरे , वास्तू याविषयी तसेच भुईकोट किल्ल्यातील महत्त्वाच्या संदर्भांचा आढावा घेत विद्यार्थ्यांसोबत वास्तू  निरीक्षण केले. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या ऐतिहासिक कार्याची ही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी कला शाखेतील प्रा.शंकर कोमुलवार ,प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी ,प्रा. शिवराज देसाई,  प्रा.प्रकाश कतनळी, प्रा.हर्षवर्धन पाटील ,प्रा.संतोष पवार, प्रा. विक्रांत विभुते  यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी कन्नूरकर यांनी केले तर आभार प्रा. शिवशरण दुलंगे यांनी मानले.

































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा