संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागाच्या माजी विद्यार्थी मेळा उत्साहात

 


संगमेश्वरच्या भूगोल विभाग माजी विद्यार्थ्यांचा मेळा उत्साहात 

 सोलापूर (रविवार दिनांक १६  एप्रिल)  भूगोल विभागातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रविवारी १६ एप्रिलला कॉलेजच्या प्रांगणात जमले होते.१९९५ पासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, अभ्यासक, गृहिणी, प्रशासक, पोलीस प्रशासन, वित्त व वितरण विभाग या बहुविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी एकत्र आले होते. प्रत्येकाने आपल्या आठवणीने उजाळा देत संगमेश्वर कॉलेजच्या संस्कारात मोठे झालो असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  सोलापूर जिल्हा भूगोल असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित निवृत्त प्राचार्य के. एम. जमादार प्रा.डॉ. नेहा चक्रदेव, प्रा. मधुरा वडापूरकर, माऊली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य  दत्तात्रय हरवाळकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.


 मेळाव्यास संगमेश्वर गीताने प्रारंभ झाला. प्रारंभी विद्यमान भूगोल विभाग प्रमुख राजकुमार मोहोरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत प्रास्तावित केले. त्यानंतर प्रा.डॉ.दीपक देडे, प्रा.डॉ.दीपक नारायणकर, सौ. दीप्ती इंगळे,प्रा.सौ.बिराजदार,किरण पुजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी धायगोडे,  प्रगतशील शेतकरी अक्षय क्षीरसागर,प्रा संतोष पवार या मान्यवरांनी आपल्या आठवणी सांगत आम्ही कसे घडलो ? आमच्या जडणघडणीत संस्था आणि  शिक्षकांचे कसे योगदान आहे हे अधोरेखित केले. भविष्यातील माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याचा आराखडा मांडला गेला.









 डॉ.चक्रदेव यांनी तत्कालीन प्राप्त परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यावर विभागाने प्रयत्न केला आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले, असे सांगितले. के. एम. जमादार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी -शिक्षक, आई-वडील, कुटुंब आणि संस्था यातील सहकार्य शिवाय आपली सर्वांगीण प्रगती शक्य नाही. त्यांचे योगदान असल्याने आज तुम्ही इथे उभे आहात. असे सांगत दिलखुलास संवाद साधला. मधुरा वडापूरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिकवत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेऊन आम्ही शिकवत गेलो म्हणून आम्हाला आजही ग्रामीण भागातले विद्यार्थी तेवढ्याच तन्मयतेने ओळखतात. त्यामुळे या अध्यापन क्षेत्रात आल्याचे समाधान वाटते असे मनोगतात सांगितले.सूत्रसंचालन प्रा. डॉ. मंजू संगेपाग यांनी केलं तर आभार प्रा.शिरीष जाधव यांनी मानले. प्रा.डॉ.शिवाजी म्हस्के यांच्यासह माजी  भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.




























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा