संस्कृत भाषाज्ञान व्यक्तीला ज्ञानसंपन्न बनवते — प्रा. श्रुती देवळे
संगमेश्वरमध्ये विश्व संस्कृत दिवस उत्साहात
सोलापूर ( दिनांक २९ ऑगस्ट २०२३ ) '' संस्कृत भाषा सर्व भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृत भाषेत भारतीय संस्कृती चा आधार आहे. ज्ञान विज्ञान गणित इत्यादी सर्व विषयांसाठी संस्कृत भाषेचे महत्त्व आहे. '' असे प्रतिपादन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित संस्कृत दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणेण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे होते.
या निमित्ताने संस्कृत मधून नृत्य गीत गायन आणि नाटकेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर संस्कृत दिनाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेश विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय संस्कृत शिक्षक प्रदीप आर्य यांनी केला. उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांमध्ये कथक नृत्य, संस्कृत का शिकावी ? यासंबंधीची पीपीटी अभिज्ञानशाकुंतलम् नाटकाचा सारांश आणि संस्कृत भाषेचा वापर या विषयावरती एक संस्कृत नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर केली गेली.
या कार्यक्रमासाठी संस्कृत विभाग आणि मराठी विभागातील विद्यार्थ्यांची तसेच विशाल जत्ती, संतोष पवार ,सुभाष पाटील, विश्वनाथ कक्ळमेली प्रकाश कतनाळे, कोमल कोंडा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थिनी श्रेयसी कुंटे तर आभार संजना सोनकडे या विद्यार्थिनीने मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा