ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा


 संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाकडून  हेरिटेज नेचर वॉकचे आयोजन

कोणत्याही शहराला जाज्वल्य इतिहास असतो. सोलापूरला देखील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात  एक मोठा इतिहास लाभलेला आहे  चार दिवस स्वातंत्र्यपूर्व कालखंडात  स्वातंत्र्य उपभोगलेले हे शहर १९ व्या शतकात कसे होते. हे या वास्तूतून लक्षात येते. म्हणून  जुन्या वास्तू पाहणे आणि त्यांचा इतिहास जाणून घेणे हे आपण विद्यार्थी संशोधक म्हणून अवश्य केले पाहिजे. ऐतिहासिक वास्तू मधून सोलापूरचा इतिहास आपल्याला माहीत होतो. त्यामुळे  आपण  सोलापूरातील  ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन  त्यांचा इतिहास समजावून घेतला पाहिजे.  या हेतूने  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने  भूगोल आणि इतिहास  विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी  हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिका,धनराज गिरजी हॉस्पिटल व डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे   प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज - नेचर वाक साठी एकूण 77 विद्यार्थी सहभाग झाले होते. रात्र महाविद्यालयाच्या प्रा.सोनाली गिरी यांनी ऐतिहासिक वास्तूबद्दल  ऐतिहासिक सविस्तर माहिती सांगितले माहिती सांगितली. याप्रसंगी कला शाखा समन्वयक प्रा. शिवशरण दुलंगे, प्रा.शंकर कोमलवार,  सौ. रश्मी कन्नूरकर, डॉ.विठ्ठल आरबळे  यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.











टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा