स्पर्धा परीक्षेतील यश सातत्यपूर्ण अभ्यासातूनच मिळते - वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन
सोलापूर दिनांक 8 प्रतिनिधी
'' स्पर्धा परीक्षेत करिअर करताना मिळालेल्या प्राप्त परिस्थितीतून कठोर परिश्रम करत आपण अभ्यास केला पाहिजे. परिस्थिती बिकट असली तरी आपल्या ध्येयापासून विचलित न होता सतत प्रयत्नवादी राहिलो, तरच आपण या स्पर्धेच्या जगात टिकू शकतो. मोबाईल, इंटरनेटच्या जगात वावरताना आपला वेळ इतर गोष्टीत जात नाही ना ? यासाठी काळ- काम आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. हे सरावातून साध्य होते. यासोबत आपली संवेदनशीलता आपण आपल्या वाचनातून, कृतीतून, बाह्य सामाजिक निरीक्षणातून टिकवली पाहिजे. उत्तम अधिकारी होताना स्पर्धा परीक्षेतील यश सातत्यपूर्ण नियोजनबद्ध अभ्यासातूनच मिळते.'' असा मौलीक सल्ला तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिला. ते भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई, भूगोल विभागप्रमुख डॉ, राजकुमार मोहोरकर उपस्थित होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर भूगोल विभाग प्रमुखांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर प्रमुख पाहुण्यांचा प्राचार्यांनी सत्कार केला. तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांची ओळख राहुल गोसावी यांनी करून दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकताना ग्रामीण परिसर अनुभवताना आणि पोलिसातील अनेक बाका प्रसंग सांगत नामदेव शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
प्रा.डॉ.शिवाजी मस्के,प्रा.डॉ.मंजू संगेपाग, प्रा.डॉ.संतोष मेटकरी,प्रा.संतोष पवार,प्रा. प्रकाश कादे, प्रा. शिरीष जाधव, प्रा.वैभव इंगळे, प्रा.धनश्री कराळे , प्रा. राहुल साळुंखे , धनंजय बच्छाव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी गोळेकर आणि रिद्धी बुवा यांनी केले.तर आभार बिराप्पा सोनकवडे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा