सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांची निवड करा - राजशेखर शिंदे


संगमेश्वरमध्ये उद्योजकता विकासावर वाणिज्य शाखेत मार्गदर्शन 


'' वाणिज्य क्षेत्रातील ज्ञान घेताना आपण सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांचा अभ्यास केला, व्यवसायाला सचोटीची जोड दिली, तर सेवा क्षेत्रात उत्तम उद्योग उभारता येईल.  सेवा क्षेत्रातील नवनवीन उद्योग सेवा व्यवसायांची निवड करा'' असे प्रतिपादन राजशेखर शिंदे यांनी केलं. ते 'माझं करियर' अंतर्गत उद्योजकता विकास या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, वाणिज्य विभाग प्रमुख बसय्य्या हणमगाव उपस्थित होते. 

प्रारंभी पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी  महाविद्यालयीन जीवनातील शिक्षणाबरोबरच उद्योग विश्वातील घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा असल्याच सांगितलं. त्यानंतर मार्गदर्शकांचा कॉलेजच्या वतीने सत्कार झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी सोलापुरातील शून्यातून उद्योगविश्वात भरारी मारणाऱ्या अनेक यशस्वी तरुणांची यशोगाथा सांगत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योग व्यवसायासाठी कसे सहकार्य केले जाते याबद्दल विवेचन केले.  ते पुढे म्हणाले की,'' नोकरदारांपेक्षा उद्योग क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा उत्पन्नाचा स्रोत मोठा आहे. महाकाय  लोकसंख्येच्या देशात सेवा क्षेत्रात  प्रचंड उद्योग आणि व्यवसायाचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा  नक्की फायदा घ्या.'' मार्गदर्शनानंतर प्रा.गौरव जुगदार यांचा जय हिंद फूड बँकेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  यावेळी विविध परीक्षांमधून  यशस्वी विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तेजश्री तळे यांनी केलं तर आभार प्रा.रवींद्र बिराजदार यांनी मांडले याप्रसंगी प्रा.संतोष पवार, प्रा.रूपाली पाटील, प्रा.निखिल काळे, प्रा.राज मुळेवाडी यांच्यासह  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 सोलापूर दिनांक ६ ऑक्टोबर 










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा