विज्ञान अकादमीच्या मानद सदस्यांची घोषणा
संगमेश्वरच्या प्रा.डॉ.दत्तकुमार म्हमाणे यांची
यंग असोसिएट व युवा वैज्ञानिक म्हणून निवड
सोलापूर प्रतिनिधी - महाराष्ट्र विज्ञान अकादमीचे मानद सदस्य, फेलो आणि युवा शास्त्रज्ञ, असोसिएट्स २०२३ ची घोषणा नुकतीच करण्यात आली. विज्ञान अकादमी महाराष्ट्र राज्याची ही प्रमुख वैज्ञानिक संस्था असून १९७६ मध्ये राज्याला भेडसावणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्यांच्या निराकारण्यासाठी या संस्थेची स्थापना केली गेलीय.विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारात रस असलेले आणि महाराष्ट्राशी विशेष नाते असलेल्या शास्त्रज्ञांची फेलो व युवा वैज्ञानिक म्हणून निवड होते. सध्या अकादमीचे अध्यक्ष प्रा.जी.डी. जाधव आहेत उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. एस. राधाकृष्णन आहेत. तर सचिवपदी प्रा.डॉ. भरत काळे कार्यरत आहेत.
अकादमी दरवर्षी फेलो आणि तरुण सहयोगींना ( युवा वैज्ञानिकांना ) त्यांच्या उत्कृष्ट संशोधनाबद्दल नामांकनाद्वारे समाविष्ट करून सन्मान करते. कोथरूड पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी येथे अकादमीची वार्षिक सभा झाली. याप्रसंगी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना मूल्याधरित शिक्षण देण्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अकादमीचे प्रतिष्ठित फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले. यावर्षी अकादमीने महाराष्ट्रामधून ३३ फेलो आणि २२ युवा वैज्ञानिक निवडले आहेत. बावीस युवा वैज्ञानिकांमधून केमिस्ट्री विभागातून आठ जणांची निवड झाली आहे. संगमेश्वर महाविद्यालयातील प्रा. डॉ. दत्तकुमार म्हमाणे यांची केमिस्ट्री विषयांमधून यंग असोसिएट २०२३ म्हणून निवड झाली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातून केमिस्ट्री विषयाचे केवळ आठ असोसिएटची निवड झालेली आहे. त्यामध्ये महाविद्यालयामध्ये काम करणारे केवळ डॉ.म्हमाणे आहेत. इतर सात असोसिएट हे काही विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत , तर काही शास्त्रज्ञ म्हणून इतर वैज्ञानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. डॉ.म्हमाणे यांच्या नावावर २९ हाय इम्पॅक्ट रिसर्च पेपर आहेत. त्यांचे संशोधन प्रामुख्याने डेव्हलपमेंट ऑफ कार्बन बेस्ट मटेरियल फोर एनर्जी स्टोरेज अँड एनवोर्मेन्ट एप्लीकेशन या विषयात आहे. डॉ.म्हमाणे यांच्या उत्कृष्ट संशोधनाची दखल घेत त्यांना केमिस्ट्री विषयातील २०२३ चा यंग असोसिएट म्हणून जो सन्मान मिळाला त्याबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा डॉ. शुभांगी गावंडे व केमिस्ट्री विभागप्रमुख डॉ. उद्धव मंडले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा