एमएचटी- सीइटीच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा प्रा. प्रफुल्लचंद्र पवार


संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात  व्याख्यानाचे आयोजन  


सोलापूर ( दिनांक २८ ) ''विज्ञान शाखेतून पुढील शिक्षणासाठी पूर्वतयारी करताना एमएचटी सीइटी  सारख्या स्पर्धा परीक्षेत विषय कोणताही असो सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा आहे. त्यासाठी वेळेचे नियोजन विद्यार्थ्यांनी करावे'' असे प्रतिपादन अहमदनगर कॉलेजचे गणिताचे प्रा. प्रफुल्लचंद्र पवार यांनी केले.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग गणित विभागाच्या वतीने आयोजित  व्याख्यानात बोलत होते.  पूर्वतयारी   एमएचटी- सीइटीची हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे  उपस्थित होते .


 प्रारंभी कॉलेजच्या वतीने व्यक्त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर स्मिता शिंदे यांनी प्रास्तावित केले. प्रास्ताविकानंतर सिद्धाराम विजापूर यांनी परिचय करून दिला. उपप्राचार्य यांनी आजच्या व्याख्यानाचे महत्त्व विशद करत आपलं मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गणित विषयाशी निगडित पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे प्रा. पवार यांनी विद्यार्थ्यांशी अभ्यासपूर्ण संवाद साधला. शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तर दिली. प्राजक्ता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी विशाल जत्ती, तुकाराम साळुंखे,  संतोष पवार,  सुभाष पाटील यांच्यसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा