वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध भारतीय परंपरा कृतीतून जपूया उपप्राचार्य डॉ .सुहास पुजारी
संगमेश्वर मध्ये बी.ए.सिव्हिल सर्व्हिसच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक दिन
सोलापूर प्रतिनिधी - '' भारताला समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे.ती अनादिकालापासून भारतीय लोक जपत आले आहेत. आपण विद्यार्थी दशेत वेगवेगळ्या पोशाखापासून, राज्या राज्यातल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. भारतीय प्रशासकीय सेवेत येताना, लोकप्रशासनाची अंमलबजावणी करताना सांस्कृतिक गोष्टी जाणल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. या बाबी समजावून घेतल्या तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची उत्तम जडणघडण होते.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी केले. याप्रसंगी वंदना भानप, विशाल राऊत, राहुल साळुंखे, रवींद्र म्हमाणे,नविता बल्लाळ, महानंदा मोटगी आदी उपस्थित होते. ते संगमेश्वर कॉलेजमध्ये बी.ए.सिव्हिल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी गणरायाला वंदन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक वंदना भानप यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. सत्कारानंतर विद्यार्थी मनोगते झाली यामध्ये श्रावणी विश्वनाथ, अर्शी मुजावर,अंकिता केगावकर, भाग्यश्री बगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवितांना संत तुकाराम महाराजांचे अभंग , कन्नड सांस्कृतिक सहसंबंध आदींचे दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून घडवले.दीपा सालोटगीमठ यांनी सूत्रसंचालन केले तर ऋतुराज बडदाळे यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा