स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या तंत्राचा अभ्यास महत्त्वाचा - वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे
संगमेश्वर कॉलेजच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण
सोलापूर प्रतिनिधी -
'' स्पर्धा परीक्षेत आयोगाचे बदललेले तंत्र आपण आत्मसात केले तर नक्कीच आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनातच आपण तयारीला लागली पाहिजे. मायक्रो नोट्स पासून ते वर्तमानपत्राच्या वाचनापर्यंत कठोर नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास या बळावर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.'' असा विश्वास तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केला. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलत होते. मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे उपस्थित होते.
संगमेश्वर गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. विठ्ठल आरबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर शिवशरण दुलंगे यांनी प्रास्ताविक केले . प्रास्ताविका नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. पाहुण्यांनी दिलखुलास संवाद साधत अनेक तपास कथांमधून पोलिसातील करिअर विषयी च्या शंकांना उत्तरे दिली. रश्मी कन्नूरकर यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे यादीवाचन केले\
निकाल याप्रमाणे-प्रथम क्रमांक - ढगे उत्तमान महादेव (संगमेश्वर कॉलेज) द्वितीय - देशमुख ऋग्वेद राहुल (संगमेश्वर कॉलेज) सावंत समृद्धी संजय ( संगमेश्वर कॉलेज ) अमृता बसवराज ( सिद्धेश्वर कन्या प्रशाला ) मुजावर अमन अल्लाउद्दीन ( सुरवसे प्रशाला) तृतीय क्रमांक - सुरवसे ऐश्वर्या सचिन ( मॉडर्न हायस्कूल) चौथा क्रमांक - इंडे अनिकेत अविनाश ( सिद्धेश्वर प्रशाला ) पाचवा क्रमांक - वाघमोडे ओंकार सुहास ( संगमेश्वर कॉलेज गायकवाड सुभिक्षा उमेश ( सुरवसे प्रशाला )
याप्रसंगी कला शाखेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी सूत्रसंचालन केले तर कोमल कोंडा यांनी आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा