शालेय वयात अभ्यासासोबत विद्यार्थ्यांचा आहार महत्त्वाचा - डॉ.सोनाली घोंगडे


संगमेश्वर पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात  

सोलापूर प्रतिनिधी 

''शालेय वयात योग्य आहार हेच औषध म्हणून गुणकारी ठरते . चांगल्या व्यायामाची पालकांनी सवय लावावी.योग्य आहाराची जोड द्यावी आठवड्यातून एकदा तरी लंघन करून फळे, भाज्यांचे रस, आवळा  रस घेऊन आपले आणि पाल्यांचे शरीर शुद्ध करावे. शुद्ध पाण्याद्वारे दररोज शरीराची अंतर्गत सफाई करता येते. चुकीच्या जीवनशैलीचे अनेक विद्यार्थी शिकार होतात त्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. त्यातून पुढे जाऊन मोठे आजार उद्भवण्याची शक्यता असते.  मुळात आजार होऊच नये यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांची दिनचर्या करावी. व्यायाम व आहाराचे वेळापत्रक तयार करावे. हे आपल्याला सहज शक्य आहे.  निसर्गोपचारातून आपले  शरीर आपण चांगले ठेवू शकतो.शालेय वयात अभ्यासासोबत  विद्यार्थ्यांचा आहार महत्त्वाचा आहे  '' असे प्रतिपादन  निसर्गोपचार तज्ञ डॉ.सोनाली घोंगडे यांनी केले. त्या संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  सौ उमा  काडादी होत्या . याप्रसंगी व्यासपीठावर  संस्थेचे अध्यक्ष  धर्मराज काडादी, सचिव  प्रा.ज्योती काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य विधिज्ञ आर. जी. म्हेत्रस ,शीतल काडादी, प्राचार्य प्रियंका समुद्रे,पर्यवेक्षक तृप्ती पसनूर  आदी उपस्थित होते.




  प्रारंभी संगमेश्वर गीत झाले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय आरशी मणियार यांनी करून दिल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार झाला.  प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतनंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.भारतीय चित्रपट सृष्टी अर्थात बॉलीवूडच्या थीमवर आधारित विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांचे वाहवा मिळवली. यासाठी नृत्यशिक्षक हरीश पुठ्ठा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  परिश्रम घेतले. गेल्या सात वर्षात पब्लिक स्कूलने केलेली प्रगती ही केवळ  पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे झालेली आहे असे सांगत धर्मराज काडादी यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले. तर  कमीत कमी वेळेत  विद्यार्थी शिक्षकांनी केलेले  प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत असे गौरव उदगार उमा काडादी यांनी काढले. 

याप्रसंगी या प्रसंगी मंगला काडादी , गुरुराज माळगे, तेजश्री काडादी, तारा व श्रेयस आळंद, पालक संघाचे उपाध्यक्ष विनोद सावळ, संतोष पाटील, डॉ.दिपाली करजगीकर,सांस्कृतिक विभागप्रमुख वीणा अन्नलदास  उपस्थित होते. तंत्रसहाय्य अक्षता रायकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनिशा किनगी व बळवंत जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार वैष्णवी देशपांडे यांनी मानले.




  










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा