आपल्या मुलांच्या क्षमता ओळखून प्रोत्साहन द्या -----बालरोगतज्ज्ञ डॉ.राजश्री मेरु
संगमेश्वर प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
सोलापूर प्रतिनिधी -
''सर्व विदयार्थ्यामध्ये उत्तम क्षमता असते.
विदयार्थ्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी शिक्षकांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून
ज्ञान दान केले पाहिजे. पालकांनी ही अट्टाहास न धरता विदयार्थ्यांच्या कलेप्रमाणे
शिकू दयावे, बदलत्या तंत्राबरोबर
विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला,
संगीत, क्रीडा या प्रकारातील वेगवेगळ्या क्षमता विकसित होत असतात त्या विकसित
होणाऱ्या क्षमतांचा परिचय आपल्याला मुलांच्या शाळेच्या वयात व्हायला हवा. त्या क्षमता ओळखूनच मुलांना आपण प्रोत्साहन
दिले पाहिजे ''
असा मोलाचा संदेश बालरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री मेरु यांनी दिला.संगमेश्वर प्री-प्रायमरी
स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साही
वातावरणात पार पडले.त्यावेळी त्या बोलता होत्या. या प्रसंगी अध्यक्षस्थानी सचिव ज्योती
काडादी होत्या. यावेळी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सौ. उमा काडादी, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य शीतल काडादी, प्राचार्य प्रियांका समुद्रे आदि मंचावर
होते.
प्रारंभी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रियंका समुद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नर्सरी ते इयत्ता दुसरीतील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच शाळेतील या वर्षीच्या गुणवंत शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सचिव ज्योती काडादी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी जंगल या थीमवर जल्लोषात नृत्य सादर केले. तर एलकेजी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शो मॉन ऑफ द मिलेनियम (राजकपूर) या वर नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी मंगला काडादी, तेजश्री काडादी, शरणराज काडादी, तारा व श्रेयश आळंद परिवार तसेच टायनीटॉटसच्या संचालिका चंदा पाटील व संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन स्कुलच्या विदयार्थ्यांनी केले. प्रास्ताविक शैलजा धुमाळ, प्रमुख अतिथींचा परिचय सुनिशा कनगी यांनी केला तर आभार मनीषा रॉय यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा