संगमेश्वर महाविद्यालयातील वाङमय मंडळ स्पर्धेत जैद हसन आणि ऋचा साळुंखेचे यश





संचार प्रतिनिधी

सोलापूर, दि. २३- संगमेश्वर महाविद्यालय मराठी विभागाच्यावतीने मराठी वाङमय मंडळ आयोजित मराठी काव्यवाचन, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेत कला शाखेतील विद्यार्थी जैद हसन यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बीसीएच्या विद्यार्थिनी ऋचा साळुंखे यांनी काव्यवाचनात द्वितीय व वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. इतर विजेते पुढीलप्रमाणे. मराठी काव्यवाचन : तृतीय- गायत्री मेट्रे, कथाकथन : द्वितीय- अश्विनी विजापुरे, तृतीय- नंदिनी खाडे, वक्तृत्व : द्वितीय- प्रथमेश गरुड.

                           या स्पर्धेतील विजेत्यांना महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, डॉ. सारीपुत्र तुपेरे, परीक्षक प्रा. संघप्रकाश दुड्डे, डॉ. मंजू संगेपांग तसेच प्रा. रेश्मा सुर्वे व प्रा. सागर सुरवसे यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धांचे उ‌द्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा सांगितली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धाचीही माहिती दिली. अशा स्पर्धांमधूनच देशाचे भावी नेतृत्व तयार होत असते, असे विचार त्यांनी मांडले. यावेळी पाहुण्याचे स्वागत कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले.

 प्रास्ताविक डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रेश्मा सुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाङमय मंडळातील विद्यार्थी प्रतिनिधी मीनाक्षी बनसोडे, गायत्री मेट्रे, प्रियंका साखरे, ज्योती बंडगर, मृण्मयी दिवाणजी, पुष्पा कांबळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रा. शिवाजी मस्के, डॉ. अण्णासाहेब साखरे, डॉ. रेश्मा शेख आणि विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे