राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा

विज्ञान मंडळाच्या वतीने संगमेश्वर कॉलेजमध्ये उपक्रम 

सोलापूर प्रतिनिधी ---

संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग, विज्ञान मंडळ यांच्या वतीने राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पोस्टर प्रेसेंटेशन  स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उदघाटन पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांच्या हस्ते झाले. परीक्षक डॉ. महेंद्र कावळे  ( वरिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशाश्त्राचे प्राध्यापक ) यांनी पोस्टर्सचे परीक्षण केले.या पोस्टर  प्रेसेंटेशनामध्ये अंतराळ विषयी आणि खगोल शास्त्र विषयी विविध पोस्टर्स विद्यार्थ्यांनी तयार करून त्याची माहिती महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना दिली.

               कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान मंडळ प्रमुख सुभाष पाटील सर,  प्रशांत शिंपी,  प्रशांत पाटील सर, प्रियांका पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी विज्ञान समन्वयक श्री विशाल जत्ती  यांच्यासोबत सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा