बहारदार पाऊस गाण्यांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण

 बहारदार पाऊस गाण्यांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण


 संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ मराठी विभागाचा उपक्रम

  काव्यवाचन, गायनातून साहित्याची गोडी लागते.

                                                         - उपप्राचार्य  सुहास पुजारी  



सोलापूर प्रतिनिधी

'' कॉलेज जीवनात नेमून दिलेला अभ्यास करताना भाषेच्या साहित्य प्रकारांचा अभ्यास करता करता कवितेची गोडी लागते.  यमक, अलंकार याबरोबर ताल सूर जमून वाचिक  अभिनयआले की     कवितेची गोडी आपोआप लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक  श्रवणाचा आनंद घ्यावा लागतो.  कथा, कादंबरीचेही तसेच आहे. गोष्टीवेल्हाळ माणसांच्या गप्पा जेव्हा वाचनात येतात. तेव्हा वाचक  लेखकाच्या जडणघडणीचा आपल्या जीवनाशी संबंध लावून लावू लागतो. उत्सुकता वाढत जाते. मग उत्तम वाचनाचा प्रवास आपोआप होत जातो.''  असे मार्गदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉक्टर सुहास पुजारी यांनी केले.  ते संगमेश्वर कॉलेज मराठी विभागाच्या वतीने आयोजित कनिष्ठ महाविद्यालयातील 'पाऊसगाणी' या कार्यक्रमात उद्घाटन सत्रात बोलत होते. यावेळी प्रा. अशोक निंबर्गी, डॉ.गणेश मुडेगावकर मंचावर होते.

                     प्रारंभिक भाषा संकुल समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार झाला. सत्कारानंतर  मराठी विभागाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. निकाल-  १ सलोनी भीमा कांबळे  (इयत्ता - अकरावी कला शाखा) ,२ संस्कृती हनुमंत मेटकरी( इयत्ता- बारावी विज्ञान ) ,३ अथर्व विजयकुमार लिघाडे ( इयत्ता- अकरावी विज्ञान) ४ श्रेया किसन शिंदे ( इयत्ता -अकरावी विज्ञान )  ५ दिशिता सोमनाथ संगा ( बारावी कला शाखा ) ६ निकिता महादेव पुजारी ( अकरावी विज्ञान ) ७ समृद्धी दत्तात्रय माळी ( अकरावी विज्ञान )   ८  ऋग्वेद राहुल देशमुख  ( बारावी कला )   ९ साईनाथ गोरख जाधव ( बारावी  विज्ञान )  १० प्रज्ञा दिनकर वाघमारे   ( इयत्ता - अकरावी )

'पाऊस गाणी'  कार्यक्रमात स्वरचित कवितेसोबत मान्यवर कवींच्या  कवितांचे अभिवाचनही झाले . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी  कवयित्री इंदिरा संत,  संदीप खरे, गुरु ठाकूर यांच्यासह नव्या जुन्यांचा मेळ घालत कविता सादर केल्या.  विश्वनाथ कक्कळमेली  यांनी  'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा' ही कविता सादर करताना विद्यार्थ्यांनी सुरात सूर मिसळले. शिवराज देसाई यांनी देखील कविता सादर केली. सूत्रसंचालन सौंदर्य पुजारी मनीषा राठोड यांनी केले तर आभार दिशिता सोमनाथ संगा यांनी मानले.



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा